संग्रामपुर [ मकसूद अली ] तालुक्यातील पातुर्डा खुर्द येथे ग्रा प प्रशासनाने या पुर्वी विविध माध्यमातुन कोरोना पासुन सुरक्षिततेसाठी जनजागृती केली लसिकरण करुन घेण्याचे आव्हान केले बुद्धीजीवी नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला परंतु काहि नागरिकात कोरोना लसिकरण संदर्भात गैरसमज असल्याने मनात भिती असल्याने ग्रा प सरपंच नंदा मानकर , ग्रामविकास अधिकारी एस पी मेहेंगे सामाजीक कार्यकर्ते विलास मानकर आशा सेविका, अंगणवाडी सेविका ,आरोग्य विभागाचे कर्मचारी, यांनी गावा घर निहाय कोरोनाचा धोका टाळण्यासाठी लस घेणे अनिवार्य असल्याने स्वता व कुटुंबाच्या सुरक्षितेसाठी लसचे महत्व पटवुन देऊन जनजागृती केल्याने नागरिकांच्या मनातील गैर समज दुर होऊन नागरिकांना प्रोत्साहित केल्याने सरपंच , ग्रामविकास अधिकारी ग्रा प प्रशासनामुळे पातुर्डा खुर्द गावातील राहिलेल्या ५५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले
पातुर्डा खुर्द येथे लसीकरण कॅम्प मध्ये ५५ नागरिकांचे लसिकरण
RELATED ARTICLES