HomeUncategorizedस्वदेशी मोगलांचा इतिहास अभ्यासक्रमांतुन कमी करण्यापेक्षा तुमच्या पूर्वजांनी ज्या विदेशी इंग्रजांची चाकरी...

स्वदेशी मोगलांचा इतिहास अभ्यासक्रमांतुन कमी करण्यापेक्षा तुमच्या पूर्वजांनी ज्या विदेशी इंग्रजांची चाकरी केली तो इतिहास उजागर करा ; ॲड. प्रा. इलियास इनामदार.!

बीड प्रतिनिधि : काही दिवसापासून वृत्तपत्रामधून वाचण्यात येत आहे वृत्तवाहिन्याद्वारे बघण्यात येत आहे की भाजपा सरकार इतिहासाच्या पुस्तकातून मोगलांचा इतिहास कमी करणार आहे परंतु आमचा भाजपा सरकारला असा प्रश्न आहे की स्वदेशी मोगलांचा इतिहास अभ्यासक्रमांतुन कमी करण्यापेक्षा तुमच्या पूर्वजांनी ज्या विदेशी इंग्रजांची चाकरी केली तो इतिहास अगोदर उजागर करावा म्हणजे लोकांना खरा इतिहास माहित होईल स्वतचा जीव वाचविण्यासाठी माफिवीर कोण होते आणि देशासाठी शहीद कोण झाले हे अख्या जगाला माहित आहे. मोगल मुस्लिम आहे म्हणून तुम्ही इतिहास मिटवणार पण शिवाजी महाराज यांच्या सैन्यात स्वराज्यासाठी लढणारे अनेक मुस्लिम सैनिक मोठमोठाल्या पदावर काम करत होते जसे तोफखाना प्रमुख इब्राहिम खान, आर-मार प्रमुख दौलतखान, सिद्दी जोहर, मदारी मेहतर, रुस्तमे जमाल, काज़ी हैदर, सात शे पठानांची सैन्य तुकड़ी असे अनेक मुस्लिम मावळे शिवाजी महाराज सोबत स्वराज्यासाठी लढले, राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यामध्ये लढावू योद्धा खुदा बक्श गौस खान होते, बाँदाचे नवाब अली बहादुर दुत्तीय यांना राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांच्या विरोधात 1857 च्या राष्ट्रीय उठावामध्ये सहभागी होवून राणी लक्ष्मीबाईची मदत करावी याकरीता अली बहादुरला राखी पाठवली अली बहादुर यांनी बहिणीला मदत करण्यासाठी दहा हज़ार सैन्य घेवून झांसीला दाखल झाले, केरळ येथील त्रावणकोरच्या राजाकडून टीपू सुलतान यांनी संघर्ष करुन दलित-मागासवर्गीय महिलांना वस्त्र परिधानचे अधिकार मिळवून दिले, महाराणा प्रताप यांचे शूरवीर सेनापती हकीम खान सुर हे हल्दी घाटी युद्धात वाघासारखे लढले व युद्धात मरण पावले समोर सम्राट अकबर यांचे सेनापती मानसिंह होते महात्मा गाँधीचा इतिहास पाहिला तर सरहद गाँधी उर्फ़ खान अब्दुल गफ्फार खान, मौलाना आज़ाद सारखे स्वातंत्रवीर राष्ट्रपुरुष आठवतात, सुभाषचंद्र बोस यांचा इतिहास पाहिला तर शाहनवाज़, आबिद हसन, कर्नल हबीबूर रहेमान यांचे नाव येणार अमर शहीद रामप्रसाद बिस्मिलचा इतिहास पाहिला तर अशफ़ाक़उल्ला खानची शहादत आठवते भारतीय सेनेचा इतिहास पाहिला तर पाकिस्तानी टैंकाची धज्जिया उड़वणारे शहीद अब्दुल हमीद आठवतील, महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले यांचा इतिहास पाहिला तर शेख उस्मान व फातिमा शेखचे योगदान आठवतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या सर्वांवर मन भरले नसतील तर परमाणु संपन्न भारत बनवणारे ए पी जे अब्दुल कलाम यांचा पण भाजपा सरकार जातीयद्वेषातुन इतिहास मीटवणार का? मोगलांचे योगदान माफिवीरांना नाही कळणार मोगल देशात स्थिर होताच बाहेरील आक्रमण थांबले कोणाची हिम्मत झाली नाही त्यांच्या काळात भारतावर हल्ले करायची, मध्ययुगीन काळात मोगलांनी देशाला जगामध्ये एक नवीन ओळख करुन दिली आहे लाल किल्ला, ताजमहल, क़ुतुबमीनार, बुलंद दरवाजा दिल्लीची शाही जामा मस्जिद औरंगाबादचा बीबीचा मक़बरा हुमायूचा मक़बरा व असे अनेक महल किल्ले व ऐतेहासिक वास्तु देशात मोगल यांनी देशवासियांना- जगाला बहाल केलेली आपणास पहावयास मिलते. परंतु ज्या पद्धतीने इंग्रजांनी भारतावर व भारतीय जनतेवर दोनशै वर्ष फोडा व राज्य करा या पद्धतीने राज्य केले त्याच विचारसरणीने आज भाजपा सरकार हे देशात जातीयद्वेष निर्माण करुन, हिंदू मुस्लिम दंगली घड़वून, शहरांची नावे बदलून, सार्वजनिक ठिकाणाची नावे बदलून, रेलवे स्टेशनची नावे बदलून, गार्डनची नावे बदलून रस्त्यायांची नावे बदलून देशाच्या इतिहासाची तोड़फोड़ करुन विकासपुरुष शेटजी व त्यांचे चेले चपाटे राज्य करत आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरुण भाजपा नेते व हिंदुत्ववादी नेते भड़काऊ भाषणे करुन धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे यामुळे देशात व देशातील प्रत्येक राज्यात दंगलीचे व मोब्लिचिंगचे वातावरण निर्माण झालेले आहे. देशातील बेरोजगारीवर, महगाईवर, महिला अत्याचारावर, बैंकाची कर्जे बुडवून पड़पुटे बाजीरावासारखे विदेशात पड़ काढणारे नीरव मोदी ललित मोदी विजय मालल्या सारखे व्यापारी मित्र, भाववाढीवर, नौकरभरतीवर, अदानी मित्रावर, भ्रष्टाचारावर, शेतक-यांच्या प्रश्नावर भाजपा सरकार बोलण्यापेक्षा हिंदू मुस्लिम मंदिर मशीद गाय गोबर भारत पाकिस्तान दंगे फसाद भोंगे सोंगे लव जिहाद हिजाब याच्या शिवाय काय बोलतच नाही. द्वेषमुक्त भारत निर्माण करण्यापेक्षा भाजपा गुलाम भारत निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहे आणि देशाची ही वाटचाल शेटजीच्या नेतृत्वामध्ये हुकूमशाही हिटलरशाहीकड़े तर नेत नाही ना? देशात लोकशाही व धर्मनिरपेक्षता कोठे जीवंत दिसत नाही जेवढा गुन्हा पाकिस्तान जिंदाबाद म्हटल्यावर होतो, जेवढा गुन्हा खलिस्तान जिंदाबाद म्हटल्यावर होतो तेवढाच गुन्हा हिंदूराष्ट्राची भाषा करणाऱ्यांवर होयला हवे यांच्यावर पण देशद्रोहाचे गुन्हे दाखल व्हायला हवे. कारण आपला देश भारत आहे आणि तो आमच्या तुमच्या ह्रदयात कायम जिंदाबाद आहे देश संविधानाद्वारे व धर्मनिरपेक्षतेच्या आधारे चालणारे आहे कोणत्याही धर्माला संविधान व धर्मनिरपेक्षतेवर हाथ घालण्याचा अधिकार नाही लव जिहादवर कार्यवाही होत असेल किंवा कायदा बनत असेल तर लव हिंदुत्वावर पण कार्यवाही व्हायला हवी त्यांच्यावर पण कायदा बनायला हवा अशी मागणी शासनाला लोकसेना करत आहे. भाजपा व त्याचे संवयघोषित हिंदुत्ववादी नेते व्यापार व सत्तेसाठी देशात समाजा समाजा मध्ये जातीय धार्मिक तेढ़ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे व भाजपा सरकार जातीय उन्मादावर डोळेझाक करत दुर्लक्ष करत आहे हे देशाची एकता अखंडता बंधुभाव समता न्याय लोकशाही धर्मनिरपेक्षता संविधान धोक्यात टाकण्याचे संकेत आहे व असेच राहिले तर भविष्यात भारताची अवस्था रशियासारखी होऊ नये कारण आज आपण पाहतो की लोकशाहीचे चारही स्थम्भ व तपास यंत्रना आज भाजपा सरकारच्या दबावाखाली काम करताना दिसत आहे हे लोकशाहीसाठी चिंतेचा विषय आहे विरोधक तपास यंत्रनेच्या भीतीने घाबरलेल्या अवस्थेत आहे विरोध केला तर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेल आणि साथ दिली तर आमदारकी खासदारकी मंत्रिपद महामंडळ म्हणून बक्षीष व स्वच्छतेचा प्रमाणपत्र मिळत आहे. जो पर्यंत भाजपा सरकारच्या विरोधात संपूर्ण भारताच्या जनतेने इव्हीएम मुक्त निवडणूक व्हावीची मागणी व असहकार आंदोलन पुकारत नाही तोपर्यंत देशाचे संकट संपणार नाही असा इशारा संपूर्ण देशवासियांना लोकसेना प्रमुख एड. प्रा. इलियास इनामदार यांनी केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments