HomeUncategorizedसर्वोत्कृष्ट वक्ता स्पर्धेत इंजि.समीर इनामदार याने मिळवले यश.!

सर्वोत्कृष्ट वक्ता स्पर्धेत इंजि.समीर इनामदार याने मिळवले यश.!

बीड : अहमदनगर येथे संस्कार भारतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट वक्ता स्पर्धेत इंजिनियर समीर इनामदार यांनी प्रथम पारितोषिक मिळवून यश संपादन केले या स्पर्धेत अनेक वक्त्यांनी सहभाग घेतला होता या सर्वांमध्ये इंजिनिअर समीर इनामदार यांनी आपल्या वक्तृत्व कौशल्याने आयोजकावर आपल्या विचारांची छाप पाडली भाषणामध्ये अत्यंत आकर्षित पणे विषयाला अनुसरून प्रभावशालीमध्ये मुद्दे मांडत उपस्थित श्रोत्यांसहित आयोजकांच्या कौतुकाची थाप मिळवली आणि विशेष म्हणजे मराठी भाषेवर असलेले प्रभुत्व दाखवून दिले इंजिनीयर समीर इनामदार हे मूळचे बीड येथील रहिवासी असून ते अहमदनगर येथे आयटी कंपनीत नोकरीत कार्यरत आहेत लहानपणापासूनच भाषणाची आवड तसेच मराठी भाषेवर असलेले प्रभुत्व याच्या जोरावरच त्यांनी हे यश मिळवले प्रास्ताविक, संगतवार कथन, अंगभूत टीका, मुद्देसूद सारांश आणि संक्षिप्त आढावा घेत आपले विचार ऐकवले अगदी मुद्देसूद मांडणी आयोजकांना आवडली श्रोता वर्गाची तसेच आयोजकांची भावना लक्षात घेता दिलेल्या विषयावर अगदी पद्धतशीरपणे आपले विचार मांडत आपले भाषण कौशल्य दाखवून दिले विषयावर जाण यामध्ये कोणतीही फेरफार न करता आवश्यक त्या बाबींची सांगड घालत समीर इनामदार यांनी हे यश संपादन केले वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण रवींद्र भारती राष्ट्रीय राज्यमंत्री, जयपूर यांच्या हस्ते करण्यात आले त्याच्या या यशाबद्दल आई वडील नातेवाईक मार्गदर्शक समाजातील विविध मान्यवरांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या समीर इनामदार हे बीड येथील प्रसिद्ध प्रिंटिंग व्यावसायिक जाकीर इनामदार यांचे सुपुत्र आहेत

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments