बीड : शहरातील पेठ बीड पोलिस ठाणे हद्दीत रविवार (आठवडी )बाजार येथे अस्तव्यस्त लावलेल्या 16 वाहनांवर कारवाई करण्यात आली. ज्या वाहनाचे मालक त्यांचे वाहन बेवारस सोडून निघून गेलेले होते आणि त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत होता असे वाहने पोलिस ठाणे येथे लोड करून आणण्यात आले आहे. असे वाहनावर आता त्यांची मालकी हककाची कागदपत्रं पाहून, चोरीची नाही याबाबत खात्री करून, आणि योग्य दंड भरून कारवाई करण्यात येणार आहे. रविवारी बाजारात गर्दी होते,वाहन अस्तव्यस्त लावल्याने आणखी गर्दी वाढून, मोबाईल चोरीच्या , मोटारसायकल चोरीच्या घटना वाढतात. यास आळा बसावा,समाज कंटक यांस धाक बसावा म्हणून आज मोहीम राबवण्यात आली होती . यातूनच दोन संशयित मोबाईल चोर नामे किरण शांताराम गुंजाळ, वय 25, कृष्ण वैजनाथ कदम, वय 25, दोघे रा. नूर कॉलनी गांधीनगर यांसही पकडण्यात आले आहे, त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, येथून पुढे त्यांच्या हालचाली वर लक्ष ठेवण्यात येणार आहे. समाज कंटकांवर ठोस कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधिक्षक श्री नंदकुमार ठाकुर, अपर पोलीस अधीक्षक श्री संतोष वाळके, यांनी निर्गमित केलेल्या आहेत. सदरील कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी श्री संतोष वाळके, यांचे मार्गदरशनाखाली पेठ बीड पोलिस ठाण्याचे ASI श्री मुंजाबा संदर्माल, सुभाष मोटे, बालाजी बास्टेवाड, गणेश जगताप, अजय सानप, सानमबिन समिदा आदी सोबत होते.
आठवडी बाजारात अस्तव्यस्त लावलेल्या वाहनावर पोलिसांची कारवाई.!
RELATED ARTICLES