अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात स्वच्छता गृहातील बकेट मध्ये अर्भक आढळून आल्या प्रकरणातील निर्दयी मातेचा पोलीसांनी शोध लावून धारुर तालुक्यातून महीलेला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी खासदार डाॕ. प्रीतमताई मुंडे यांनी नाराजी व्यक्त करताच पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवूनमुसक्याआवळल्या आहेत.याबाबत सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, दि.३ डिसेंबर सकाळी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात सफाई करताना कर्मचाऱ्यास ३५ नंबरच्या अपघात विभागातील स्वच्छता गृहातील बकेट मध्ये स्त्री जातीचा अर्भक आढळून आले होते .या घटनेने एकच खळबळ माजली होती. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने पोलीसांकडे रितसर तक्रार केली होती . परंतु आठवडा होऊन गेला तरी याप्रकरणी काहीच निष्पन्न झाले नव्हते.तीन दिवसां पूर्वी खासदार डाॕ. प्रीतमताई मुंडे यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयास भेट दिली.तेव्हा अर्भक प्रकरणी नाराजी व्यक्त करत पोलीस व रुग्णालय प्रशासनाला खडेबोल सुनावले होते.यानंतर अंबाजोगाई पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवून अखेर खासदारांनी नाराजी व्यक्त करताच तीन दिवसांत छडा लावला. त्या अर्भकाच्या निर्दयी मातेला रविवारी दि.११ डिसेंबर रोजी धारुर तालुक्यातील एका तांड्यावरुन ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे.तसेच संबंधीत पुरुषाचे हे पाचवे अर्भक असल्याचे समजते.
त्या दुर्देवी बाळाची निर्दयी माता पोलिसांच्या ताब्यात.!
RELATED ARTICLES