केज : वाळुची अवेद्य वहातुक नदी पाञातुन चोरुन होत असल्याचा केज पोलीसांना करुन खोटी माहीती दिल्यावरुन हकनाक गुन्हा दाखल झाला आहे.अडचणीच्या आणी संकटात तात्काळ मदत मिळावी म्हणून ११२ या नंबरवर फोन करून पोलिसांची मदत घेता येते.परंतु काही अतीशहाणे त्याचा दुरुपयोग करून नाहक प्रशासकीय यंत्रणेला वेठीस धरतात.अशाच दोन बेवड्यांना केज पोलिसांनी कायद्याचा हिसका दाखविला आहे.या बाबतची माहिती अशी की,केज येथील रात्रगस्ती वरील पोलीस पथकाच्या ११२ क्रमांकावर केज तालुक्यात वाळू चोरी होत असंल्याची माहिती पोलिसांना दिली. फोन करणारे शिवकुमार घाडगे यांनी माझा मो क्र.९८६०५९०६२९ वर फोन करून सांगितले की, तुम्ही लवकर आला नाहीत तर त्याचा मित्र आश्रुबा चव्हाण हा फाशी घ्यायला पळत आहे. असे तो वारंवार पोलिसांना फोन करुन लवकर येण्यास सांगत होता. ही माहिती मिळताच पोलीस नाईक राजू गुंजाळ, पोलिस नाईक चंद्रकांत काळकुटे आणी गृहरक्षक दलाचे जवानांचे पथक तात्काळ लाखा येथे पोहोचले.पोलिसांनी आश्रुबा चव्हाण व शिवकुमार घाडगे यांचा शोध घेऊन वाळू चोरी कोठे होत आहे?या बाबत विचारणा केली. तेव्हा ते दोघेही मोठमोठयाने हसु लागले. या दोघांनी पोलिसांना खोटी माहिती दिली असल्याचे निदर्शनास आले.ते दोघेही अंमली पदार्थाच्या नशेत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.त्यांच्या तोंडाचा आंबट व उग्र वास येत होता. त्यांनी दारुच्या नशेत खोटी माहीती दिल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवुन त्यांची उपजिल्हा रुग्णालय केज येथे वैद्यकीय तपासणीकेली.उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी आश्रुबा भास्कर चव्हाण व शिवकुमार संदीपान घाडगे हे मद्याच्या अंमलाखाली असल्याचा अभिप्राय दिला.वैद्यकीय अहवाल प्राप्त होताच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रमेश सानप यांच्या फिर्यादी वरून आश्रुबा भास्कर चव्हाण व शिवकुमार संदीपान घाडगे या दोघांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु.र.नं ५६१/२०२२ भा. दं. वि.१७७ आणि महाराष्ट्र दारू बंदी कायदा ८५ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राजू गुंजाळ हे पुढील तपास करत आहेत.
पोलीसांना खोटी माहिती देणे आले अंगलट.!
RELATED ARTICLES