HomeUncategorizedमाहेरच्या लोकांकडुन एक लाख रुपये घेऊन ये म्हणत शारीरिक व...

माहेरच्या लोकांकडुन एक लाख रुपये घेऊन ये म्हणत शारीरिक व मानसिक छळ.!

केज : तालुक्यातील साळेगाव येथील तीस वर्षीय विवाहितेचा एक लाख रुपयासाठी वांजरखेडा,जि.लातुर येथील सासर कडील मंडळीने शारीरिक मानसिक छळ केला असुन केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, केज तालुक्यातील साळेगाव येथील पुजा बालाजी मस्के वय तीस वर्षे, व्यवसाय घरकाम हीला सासरकडील नातेवाईक तुझ्या माहेरकडुन एक लाख रुपये घेऊन ये व शेताचा हिस्सा घे म्हणत शिवीगाळ करून मारहाण करून उपाशीपोटी ठेवुन शारीरीक व मानसीक त्रास देवुन जाच जुलुम करून जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन आरोपी बालाजी रामा मस्के (पती),पदमीन (सासु ),आहील्या सुधाकरगायकवाड(नणंद)सावित्रा बालाजी मगर (नणंद ),अरूणा पप्पु भडंगे (नणंद ), बालाजीगालफाडे(नणंद )बालाजी गालफाडे (नंदावा ),राहुल बालाजी मगर (भाच्चा),गणेश सुधाकर गायकवाड (भाच्चा),कोमल बालाजी मगर (भाच्ची) सर्व रा. वांजरखेडा ता.जि.लातुर यांच्याविरुद्ध केज ठाण्यात गु.र.नं ५५६/२०२२कलम ४९८,अ, ३२३,५०४,५०६,३४ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशावरुन पोलीस नाईक गंभीरे हे करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments