केज : तालुक्यातील नाव्होली माहेर असलेल्या गंगा सोनाजी कदम वय ३८वर्षे व्यवसाय घरकाम हिचाआरोपीपती-सोनाजी उत्तम कदम रा.साखरे बोरगाव ता.बीड हल्ली मुक्काम गुरुवारपेठ अंबाजोगाई,पत्नी गंगा सोनाजी कदम हिला मुलबाळ होत नाही म्हणुन वारंवार पत्नी गंगासोनाजी कदम हिला पती सोनाजी कदम यांनी वेळोवेळी उपाशीपोटी ठेवून शारिरिक व मानसिक त्रास दिला त्यावरच तो थांबला नाही तर त्याने दुसरे लग्न सीमा हिच्याशी केले व तो दुसरी पत्नी सिमा हीस घेऊन घरी आला.त्यानंतर त्याने पहिली पत्नी गंगासोनाजी कदम हिला तु आता माझ्या खोलीत राहायचे नाही असे म्हणुन संगनमताने दोघांनी शीवीगाळ करून केसाला धरून,लाथाबुक्याने, काठीने मारहान करून जीवे मारण्याची धमकी दिली म्हणुन गंगा सोनाजी कदम हिच्याफिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात सोनाजी उत्तम कदम व सीमा सोनाजी कदम यांच्या विरुद्ध गु.र.नं. ५५७/२०२२,४९८ (३), ४९४, ३२४, ३२३, ५०४,५०६,३४ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
मुलबाळ होत नाही म्हणून विवाहीतेचा छळ
RELATED ARTICLES