केज : तालुक्यातील उमरी येथे कर्तव्यावर असलेल्या लाईनमनला एकाने धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.या बाबतची सविस्तर माहिती अशी की,शुक्रवार दि.२ डिसेंबर रोजी वीज वितरण कंपनीचे विशाल गायकवाड हे उमरी येथे लाईट बिल वाटप करीत असताना अरूण लिंबा शिंपले रा.उमरी याने त्यांना शिवीगाळ केली. तसेच विशाल गायकवाड यांच्या गच्चीला धरून हातातील लाईट बिले फेकून देत सरकारी कामात अडथळाआणला.या प्रकरणी लाईनमन विशाल गायकवाड यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात अरूण लिंबा शिंपले रा.उमरी याच्या विरुद्ध गु.र.नं५५४/२०२२ भा दं वि ३५३,३२३ आणी ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे पुढील तपास करीत आहेत.
लाईनमनला धक्काबुक्की
RELATED ARTICLES