केज : तालुक्यातील कानडी माळी येथील महिला शेतकरी अर्चना नवनाथ आगरकर वय २५ वर्षे व्यवसाय शेती रा.कानडी माळी या दिनांक ०२ डिसेंबर रोजी सकाळी ११-०० वाजता आपल्या कानडीमाळी येथील साबला या शेतामध्ये काम करत असताना तेथे रामा मारुती आगरकर व मारुती आगरकर हे संगनमत करून दोघे आले व शिवीगाळ करत तु या शेतामध्ये यायचे नाही अशी कुरापत काढुन अर्चना नवनाथ आगरकर यांच्या डोक्यात लाकडाने जोराने मारून डोके फोडुन दुखापत केली म्हणुन अर्चना नवनाथ आगरकर यांच्या फिर्यादीवरुन केज पोलिस ठाण्यात रामा मारुती आगरकर व मारुती आगरकर यांच्या विरुद्ध गु.र.नं. ५५५/२०२२ भा.दं.वी.कलम ३२४,३२३,५०४,५०६, ३४ भादंवी नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस नाईक सोपने करत आहेत.
शेतात काम करत असलेल्या महीलेला मारहाण
RELATED ARTICLES