केज : येथील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या लोकमित्र वृत्तपत्राच्या बैठकीत संपादक शेख ताहेर यांच्यासह हिंदी दैनिक वैचारिक जंग चे संपादक शेख जुबेर यांच्या प्रमुख उपस्थितीत ॲड. युवराज विष्णू फुन्ने यांची किल्ले धारूर तालुका प्रतिनिधी पदी नियुक्ती करण्यात आली. या बैठकीस लोकमित्र चे केज तालुका प्रतिनिधी चंद्रकांत पाटील यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार तात्या गवळी सर,पत्रकार सचिन साखरे, वैभव आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना धारूर तालुक्याचे नवनियुक्त प्रतिनिधी ॲड. युवराज विष्णू फुन्ने म्हणाले की, लोकमित्र चे बोध वाक्य असलेले घटना जशी बातमी तशी याला अनुसरून आपण निरपेक्ष भावनेने काम करणार आहोत. प्रतिनिधी म्हणून काम करताना संपादक ताहेर भाई यांचे मार्गदर्शन व सहकार्य सदैव मिळत राहील यात दुमत नाही असे म्हटले. यावर लोकमित्र वृत्तपत्रासाठी काम करणाऱ्या प्रत्येक प्रतिनिधीला संपादक या नात्याने सदैव खंबीर साथ व मार्गदर्शन देणे हे आपले कर्तव्य असून ते आपण नेहमी पार पाडू असे संपादक शेख ताहेर यांनी म्हटले. यावेळी उपस्थितांनी ॲड. युवराज विष्णू फुन्ने यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
लोकमित्र च्या धारूर तालुका प्रतिनिधी पदी ॲड. युवराज फुन्ने यांची नियुक्ती
RELATED ARTICLES