HomeUncategorizedउसाच्या ट्राॕलीला मोटार सायकलची धडक ; तरुणाचा मृत्यु

उसाच्या ट्राॕलीला मोटार सायकलची धडक ; तरुणाचा मृत्यु

केज : ऊसाचा ट्रॅक्टर समोर न दिसल्याने ट्राॕलीवर पाठीमागून जोरदार धडक बसून दुचाकीस्वार तरुण ठार झाल्याची घटना केज-मांजरसुंबा रस्त्यावर मस्साजोग येथील पेट्रोल पंपासमोर रविवारी दिनांक २७ रोजी सायंकाळी घडली आहे.आकाश राजाभाऊ नेहरकर रा.पिसेगाव ता. केज असे मयत तरुणाचे नाव आहे.आकाश हा सायंकाळी मांजरसुंबा येथून दुचाकी क्रमांक एम. एच.४४ जे ७४३५ वरून केजच्या दिशेने येत होता. दरम्यान मस्साजोग येथे देशमुख पेट्रोल पंपाजवळ केज येथील कारखान्यावर ऊस घेऊन जात असलेला ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. २५ जी २२८१च्या ट्राॕलीला दुचाकी पाठीमागून जोरदार धडक बसली.यामध्ये दुचाकी स्वार आकाश नेहरकर गंभीर जखमी झाला. यामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली.घटनेची माहिती मिळताच केज पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments