HomeUncategorizedदोन गटात तुंबळ हाणामारी.!

दोन गटात तुंबळ हाणामारी.!

केज : तालुक्यातील शिंदी येथे दोन गटात क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाली असून पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यात पंचायत समितीचे माजी सभापती संदीप जाधव पाटील यांचाही समावेश आहे.या बाबतची सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्यातील शिंदी येथील यशवंत आंनदराव जाधव यांनी केज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:१५ वाजण्याच्या सुमारास त्यांनी खरेदी केलेली नवीन गाडी क्रमांक एमएच ४६ -झेड ८५५८ हिची पुजा करण्यासाठी गावातील रेणुकामाता देवीचे मंदीरात गेले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या चुलत भावाचा मुलगा शशीकांत धर्मराज जाधव,असे दोघे मंदीरात गेले होते.तेथील गुरव सज्जन राजाभाऊ गुरव यांचे हस्ते नवीन गाडीची पुजा केली.पुतण्यास नवीन गाडी शिंदी चौकात घेवून जाण्यास सांगीतले व ते पायी शिंदी चौकात आले.तेव्हा तेथे त्यांचे मित्र भेटले.त्यांना त्यांनी शिंदी चौकातील प्रकाश माळी यांचे हाँटेलमध्ये चहा घेतला.तो पर्यत गाडी चौकाच्या पुढे पंन्नास फुट अंतरावर उभी केली होती. ते हॉटेल मधुन गाडीकडे जात असताना ८:३० वाजता त्यांची गाडी आडवुन त्यांच्या डाव्या हाताला धरुन गोवींद सुधीर जाधव पाटील याने त्याच्या हातातील लोखंडी पाईप पाठीतमारला.माजी सभापती संदीप संजय जाधव पाटील,सुधीर चंद्रसेन जाधव पाटील यांनी मिळुन तुम्ही देवीचे आम्हाला न विचारता नारळ का फोडलास? या कारणाची कुरापत काढुन चापटाबुक्याने लाथाने मारहाण करुन शिवीगाळ केली.कुटुंबाला जीवच मारुन टाकतो.अशी धमकी दिली.त्यावेळी त्यांचा पुतण्या शशीकांत हा भांडण सोडविण्यास आला असता त्याला पण चापटा-बुक्याने लाथाने मारहान करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
यशवंत आंनदराव जाधव यांच्या तक्रारी वरून गोवींद सुधीर जाधव पाटील,संदीप संजय जाधव पाटील,सुधीर चंद्रसेन जाधव पाटील सर्व रा.शिंदी यांचे विरुद्ध फिर्याद आहे केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर गोवींद सुधीर जाधव पाटील यांनी केज पोलिस ठाण्यात अशी तक्रार दिली आहे की, दि.२६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३० वाजता ते गावातील चौकात सुभाष जाधव यांचे हॉटेल समोर रस्त्यावर उभा होते. त्यावेळी गावातील यशवंत अनंतराव जाधव व शशीकांत धर्मराज जाधव हे दोघेजण आले.त्यांनी गावातील ८:३० वाजता गुरव सज्जन राजेभाऊ गुरव यांचे भांडणामध्ये तुम्ही का सोडवासोडव केलीस?अशी कुरापत काढुन त्या दोघांनी मिळुन त्यांना गच्चीला धरुन चापटाबुक्याने लाथाने मारहान केली व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.त्यावेळी भांडणाचा आवाज ऐकुन वडील सुधीर चंद्रसेन जाधव आणि भाऊ संदीप संजय पाटील हे येवुन भांडण सोडवित असताना सुर्यकांत यशवंत जाधव, रमाकांत धर्मराज जाधव हे त्यांचे मोटारसायकलवर येवुन रमाकांतने त्यांना धरुन खाली पाडले. सुर्यकांतने त्याचे हातातील लोखंडी पाईपाने त्यांच्या पाठीत मारुन मुक्का मार दिला.चौघांनी मिळुन शिवीगाळ करुन चापटाबुक्याने लाथाने व लोखंडी पाईपाने मारहाण करुन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
या प्रकरणी गोविंद सुधीर जाधव पाटील यांच्या फिर्यादी वरून यशवंत अनंतराव जाधव, शशीकांत धर्मराज जाधव, सुर्यकांत यशवंत जाधव आणी रमाकांत धर्मराज जाधव सर्व रा.शिंदी ता. केज यांचे विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments