HomeUncategorizedअल्पवयीन मुलीचे अपहरण !

अल्पवयीन मुलीचे अपहरण !

केज : शहरातील एका भागात वास्तव्यास असलेल्या एका सतरा वर्षीय परप्रांतीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली आहे.सदर प्रकरणी मुलीच्या चुलत भावाने केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील एका भागात एक परप्रांतीय कुटुंब वास्तव्यास आहे.सदर घरातील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस दि.२४ नोव्हेंबर रोजी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर मुलीचा कुटुंबीयांनी शोध घेतला असता ती दिसून न आल्यानेमुलीच्या चुलत भावाने केज पोलीसांत तक्रार दिली आहे. तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments