केज : भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तिस चापटाने, लाथा बुक्यांनी,स्टीलच्या पाण्याने मारहाण करून दुःखापत केली म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की,केज तालुक्यातील तांदळ्याचीवाडी येथील राम भगवान तांदळे , पांडुरंग किसन आव्हाड रा.तांदळ्याचीवाडी यांचे एका सोबत दिनांक २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७-०० वाजता साळेगाव च्या जवळ पुलावरती भांडणे सुरू असताना लक्ष्मण रामचंद्र तांदळे वय ५० वर्ष व्यवसाय शेती रा.तांदळ्याचीवाडी हे भांडण सोडविण्यास गेले असता पांडुरंग किसन आव्हाड याने शिवगाळ करुन चापट,मारून लाथाबुक्याने मारहाण केली तर राम भगवान तांदळे याने स्टीलच्या नटबोल्ट खोलायचे पान्ह्याने कपाळावर मारून दुखापत केली म्हणुन लक्ष्मण रामचंद्र तांदळे यांच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात राम भगवान तांदळे व पांडुरंग किसन आव्हाड यांचे विरुद्ध गुरन ५४१/२०२२ कलम ३२४,३२३,५०४,३४ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशावरुन पोलीस नाईक काळकुटे हे करत आहेत.
भांडण सोडवणे आले अंगलट ; झाली धुलाई !
RELATED ARTICLES