HomeUncategorizedअज्ञात वाहनाची मोटार सायकलला मागुन धडक ; मोटार सायकल स्वार जखमी

अज्ञात वाहनाची मोटार सायकलला मागुन धडक ; मोटार सायकल स्वार जखमी

बीड: केज -मांजरसुंबा रोडवर केज शासकीय विश्रामगृहाच्या जवळ सहारा हॉस्पीटलच्या समोर टि.व्ही.एस. कंपनीच्या मोटर सायकलला अज्ञात वाहन चालकाने पाठीमागुन जोराची धडक देऊन पलायन केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,केज शहरातील केज- मांजरसुंबा रोडवर शासकीय विश्रामगृहाच्या जवळ सहारा हॉस्पीटलच्या समोर अजहर अजीज शेख वय ३७ वर्ष व्यवसाय व्यापार रा.खाजानगर केज दिनांक २०नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६:०० वाजण्याच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकापासुन आपल्या घरी मोटर सायकल टिव्हीएस कंपनीची गाडी क्र.एम एच ४४ एम ५१५० वरून जात असताना शहरातील केज-मांजरसुंबा रोडवर शासकीय विश्रामगृहाच्या जवळील सहारा हॉस्पीटलच्या समोर पाठीमागुन येत असलेल्या विस्टा कंपनीच्या सिल्वर कारच्या अज्ञात चालकाने हायगयीने आणी निष्काळजीपणाने बेधडक गाडी चालवून मोटार सायकलला पाठीमागुन जोराची धडक देऊन पलायन केले म्हणुन केज पोलिस ठाण्यात अजहर अजीज शेख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालका विरुद्ध गु.र.न.५३३/२०२२ कलम २७९,३३७ भादंवी सह कलम २३४ मोटार वाहन कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री.शेप हे पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments