बीड : रेशन दुकानावर मिळणारे धान्याचे वितरण दिवाळीच्या अगोदर तात्काळ व सुरळीत करून गोरगरीबांची दिवाळी साजरी करण्यास मदत करा अशा सुचना आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड मतदारसंघातंर्गत येणाऱ्या बीड व शिरूर (का.) तहसिलदार यांना केल्या आहेत.पुरवठा विभागामार्फत रेशन दुकानावर मिळत असलेले धान्य व तत्सम साहीत्य दिवाळीच्या अगोदर गोरगरिबांच्या घरात पोहचले तर, त्यांची दिवाळी चांगली साजरी होईल. धान्य वितरणाच्या कामात अनियमितता येऊ नये व ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांची गैरसोय होता कामा नये. तसेच यासंदर्भात कसल्याही प्रकारची तक्रार येऊ नये याची काळजी घ्या. बीड विधानसभा मतदारसंघातील बीड शहर, बीड ग्रामीण तसेच शिरूर (का.) भागात धान्य वितरण सुरळीत आणि तात्काळ करा अशा प्रकारच्या सुचना दोन दिवसांवर आलेल्या दिवाळी सणाच्या अनुषंगाने आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड व शिरूर (का.) तहसिलदारांसह संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी आ.संदीप क्षीरसागर यांनी पत्रव्यवहार केला आहे.
दिवाळी अगोदर धान्य वितरीत करा – आ.संदीप क्षीरसागर
RELATED ARTICLES