HomeUncategorizedबीड शहरातील रस्त्यांच्या कामांचे उद्घाटन, ठरताहेत लबाडा घरचे निमंत्रण

बीड शहरातील रस्त्यांच्या कामांचे उद्घाटन, ठरताहेत लबाडा घरचे निमंत्रण

बीड (प्रतिनिधी) – शहरातील अनेक रस्त्यांची व नाल्यांची कामे प्रलंबित असून यापैकी अनेक कामांचे भूमिपूजन अनेकदा करण्यात आलेली आहेत. तरी सुद्धा बऱ्याच काळापासून शहरातील अनेक रस्ते व नाल्यांच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात होत नाही. अशाच प्रकारे आसेफ़नगर चा नाला व रस्त्याचे उद्घाटन दस्तूरखुद्द विद्यमान आमदारांच्या हस्ते होऊन २० ऑक्टोबर २०२२ रोजी पुर्ण एक महिना उलटला तरी प्रत्यक्ष कामास सुरुवात काही झालेली नाही.यामुळे आता रस्त्यांच्या कामांचे उद्घाटन ठरताहेत लबाडा घरचे निमंत्रण असे बीड शहरवासीय मोठ्या प्रमाणात म्हणत असल्याचे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, शहरातील अनेक रस्ते व नाल्यांच्या कामासाठी निधी मंजूर झाल्याच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमाद्वारे आतापर्यंत अनेकदा जनतेसमोर लोकप्रतिनिधींनी आणलेल्या आहेत. मात्र कामांना प्रत्यक्षात सुरुवात काही अजून झालेली नाही. यामध्ये प्रामुख्याने शिवाजी महाराज चौक ते बालेपीर पर्यंत चा अहेमदनगर रोड हा राज्य महामार्ग, शिवाजीनगर पोलीस ठाणे कॉर्नर ते थोरातवाडी कॉर्नर पर्यंतचा रस्ता व मोठा अगडबंब नाला, जय महाराष्ट्र हॉटेल ते बार्शी नाका चौक ते मोमीनपुरा पर्यंत चे रस्ते, तकिया मस्जिद कॉर्नर ते खासबाग देवीपर्यंत चा आडत मार्केट समोरील मुख्य रस्ता, तकिया मस्जिद कॉर्नर ते माने पेट्रोल पंप कॉर्नर पर्यंत चा रस्ता, अंबिका चौक ते अर्जुन नगर रस्ता, राजीव गांधी चौक ते व्यंकटेश स्कुल रस्ता, राधाकिसन नगर ते सरस्वती शाळा सिमेंट रस्ता व नाली, सुभाष रोड च्या ढाकणे हॉस्पिटल समोरील जुन्या भाजी मंडई कडे येणारा रस्ता, मसरत नगर ते नेत्रधाम-सावरकर चौक रस्ता, शीतल वस्त्र भंडार दोन्ही बाजूचे रस्ते, पेठ बीड पोलीस ठाणे-ईदगाह-नाळवंडी नाका रस्ता, नाळवंडी नाका-पाण्याची टाकी रस्ता, बालाजी मंदिर ते काळा हनुमान ठाणा रस्ता इत्यादी रस्ते व नाल्यांच्या कामांकडे बीड शहरवासी डोळे लावून बसले आहेत. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून बीड शहरवासियांना प्रतीक्षेशिवाय काहीही हाती लागत नाहीये. वरील सर्व कामांसाठीशासनाकडून आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला असल्याच्या बातम्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून प्रसिद्धी माध्यमाद्वारे सातत्याने वेळोवेळी जनतेसमोर आणले जाते. मात्र ही कामे काही केल्या सुरु होत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. असे असतानाही अनेकदा आळीपाळीने कधी आमदार, कधी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक हे सर्वजण मिळून वर उल्लेख केलेल्या अनेक रस्ते कामाचे नारळ फोडून उद्घाटने करतात. परंतु त्यांनी आतापर्यंत केलेले व करत असलेली उद्घाटने म्हणजे लबाडा घरचे निमंत्रण ठरत असल्याचे मत हा सगळा सावळा गोंधळ पाहून बीड शहरवासीय जनता म्हणत असल्याचे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments