HomeUncategorizedएसटी आणी पिकअपचा अपघात ; एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू तर एक जण...

एसटी आणी पिकअपचा अपघात ; एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू तर एक जण गंभीर जखमी..!

केज : केज-मांजरसुंबा रोडवर मस्साजोग नजीक एस टी आणी पिकअपचा गंभीर अपघात झाला असून अपघातात एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णवाहीकेतून दवाखान्यात हलवण्यात आले.सोमवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास केज-मांजरसुंबा रोडवर मस्साजोग नजीक हनुमंत पिंप्रीकडे जाणाऱ्या फाट्याजवळ सोयाबीन काढणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारे पिकअप क्र. एम एच/३२/बी ९७३६ आणी धारूर आगाराची धारूर-मुंबई क्र. एम एच-१४ बी टी-२५१५ यांचा अपघात झाला. या अपघातात सोयाबीन कापणीचे काम करणारे आदिनाथ घोळवे वय ३० वर्ष रा. मुंडेवाडी व बाबासाहेब ठोंबरे वय ३६ वर्ष रा.दहिफळ वडमाऊली या अपघातामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू तर एकदम गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.या अपघाताची माहिती मिळताच १०८ क्र. रुग्णवाहिका चालक मकरंद घुले यांनी तात्काळ घटनास्थळी हजर होत जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे दाखल करण्यात आले.परंतु उपचारा दरम्यान अजिनाथ मच्छिंद्र गुळवे यांचा मृत्यू झाला. तर बाबासाहेब शंकर ठोंबरे यांना लातूर येथील दवाखान्यात नेण्यात आले असून त्यांच्यावर लातूर येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत.यादरम्यान अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील,पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, जमादार उमेश आघाव, पोलीस जमादार देवकते, पोलीस नाईक बाळराजे सोनवणे,पोलीस नाईक महादेव बहिरवाळ यांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना मदत केली.सदरील घटनेचा पुढील तपास केज पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments