HomeUncategorizedदुकानदाराचा कान कापून गंभीर दुखापत करत मारहाण ; पोलिसात गुन्हा दाखल

दुकानदाराचा कान कापून गंभीर दुखापत करत मारहाण ; पोलिसात गुन्हा दाखल

केज : अंबळाचे बरड फाटा येथे एकाला चाकूने व मोटर सायकलच्या शॉकअपने आणी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केलेल्यांची घटना घडली.याबाबतची सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्यातील जोला येथील रहिवासी ज्ञानेश्वर नामदेव ढाकणे वय ३६ वर्षे यांचे पंक्चरचे दुकान आंबळाचे बरड येथे आहे.दि.३ऑक्टोंबर २०२२ रोजी दुपारी २:१५ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी ज्ञानेश्वर नामदेव ढाकणे हे त्यांच्या दुकानासमोर असताना आरोपी रामदास जगन्नाथ मुंडे रा. देवगाव ता.केज आणी कांबळे यांनी संगनमत करून आरोपी रामदास जगन्नाथ मुंडे यांनी फिर्यादीच्या कानावर चाकूने मारून कान कापून गंभीर दुखापत केली. कांबळे याने फिर्यादीच्या हाता पायावर मोटार सायकलचे शॉकअप आणी रॉडने मारहाण करून मुकामार दिला व शिवीगाळ केली. आरोपीने फिर्यादीच्या आईस पण शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून ज्ञानेश्वर नामदेव ढाकणे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात आरोपी रामदास जगन्नाथ मुंडे आणी कांबळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मेसे पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments