HomeUncategorizedमहेदवीया मस्जीद च्या जागेची अहेमदनगर येथील अभियंत्यांकडून पाहणी

महेदवीया मस्जीद च्या जागेची अहेमदनगर येथील अभियंत्यांकडून पाहणी

बीड (प्रतिनिधी) – शहरातील जुना बाजार भागात असलेल्या लोहार गल्ली भंडार गल्ली स्थित महेदवीया मस्जीद च्या जागेची अहेमदनगर येथील अभियंत्यांनी पाहणी करून शासन-प्रशासनाकडे पाठपुरावा करत मस्जिद ची जागा ताब्यात घेत लवकरच मस्जिद चे काम सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे भेट दिलेल्या अभियंत्यांच्या शिष्टमंडळाने महेदवीया मस्जिद चे विश्वस्त तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांना आश्वस्त केले. याविषयी सविस्तर वृत्त असे की, गेल्या अनेक वर्षांपासून महेदवीया मस्जिद ची जागा शेजारी राहणाऱ्या इसमाने गिळंकृत करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी मस्जिदचे विश्वस्त एस.एम.युसूफ़ यांनी शासकीय-प्रशासकीय स्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केला असून याची माहिती अहेमदनगर येथील इंजि. शेख हुज़ेफ़ा, इंजि. सय्यद तमीम, इंजि. शेख सोहेल यांना कळाल्यावर त्यांनी १ ऑक्टोबर २०२२ रोजी बीडला येऊन मस्जिद च्या जागेची पाहणी केली व आश्वस्त केले की, शासकीय-प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून मस्जिदची जागा ताब्यात घेऊ व बांधकाम करून मस्जिद सुरू करू. याकरिता आमच्यासह जमाअत ए महेदवीया, दर्गाह दायरा कमेटी, अहेमदनगर तन मन धनाने आपल्या सोबत आहे असे म्हटले. यावेळी युसूफ़ यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments