बीड : गुजरात राज्यातील बिल्कीस बानो अत्याचार प्रकरणात आजन्म करावासाची शिक्षा भोगत असलेल्या ११ दोषींना गुजरात सरकारने त्यांची शिक्षा माफ करून काही दिवसांपूर्वी तुरुंगातून सोडून दिले. एवढेच नाही तर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांच्याबद्दल स्तुती सुमने उधळून त्यांना फुल-हार घालत त्यांचे औक्षण करण्यात आले. या निर्णयाबाबत संपूर्ण भारतात आता हळूहळू तीव्र प्रतिक्रिया उमटत असून याची सुरुवात बीड जिल्ह्यातून गुरुवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी झाली. बीड शहराच्या इतिहासात कधी नव्हे ते मुस्लिम महिलांनी हजारोंच्या संख्येने एकञ येऊन किल्ला मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अगदी शांततेत मोठ्या शिस्तीने मूक मोर्चा काढून बिल्कीस बानो वर अत्याचार केलेल्या दोषींना झालेली आजन्म कारावासाची शिक्षा भोगण्यासाठी पुन्हा कारागृहात पाठविण्यात यावे अशी मागणी केली. याची दखल सोशल मीडिया, प्रेस मीडियासह वृत्तवाहिन्यांनीही घेतली.माञ इंडिया टीव्हीने “ध” चा “मा” करत केला खोडसाडपणा !मुस्लिम महिलांनी ज्यासाठी मोर्चा काढला होता, त्याचा जो आशय व सार होता त्याला बगल देत इंडिया टीव्ही नामक वृत्तवाहिनीने “ध” चा “मा” करत भलतेच वृत्त प्रसारित केले. या वृत्तामुळे आपल्या भारत देशात गुण्यागोविंदाने राहत असलेल्या सर्वधर्मीय बांधवांमध्ये उभी फूट पाडण्याचे षड्यंत्र स्पष्ट दिसून आले. अगोदरच अत्याचारी-दुराचारी ११ दोषींना गुजरात सरकारने शिक्षा माफ करत तुरुंगातून सोडून दिल्याने जनक्षोभ वाढत असताना त्यावर तेल ओतण्याचे कार्य इंडिया टीव्ही नामक वृत्तवाहिनीने केले आहे.क्रिकेट आणि दोषीत ११ चा योगायोग …..आपल्या भारत देशात सर्वात जास्त लोकप्रिय असलेला खेळ म्हणजे क्रिकेट. १३० कोटी जनतेच्या देशाचा आपला भारतीय संघ ११ खेळाडूंसह खेळण्यासाठी जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा प्रत्येक क्रिकेट प्रेमी जीव की प्राण होऊन टीव्ही समोर बसून सामना पाहतात. आपला संघ जिंकला की मोठ्या प्रमाणात फटाके ही फोडले जातात. जर क्रिकेटच्या विश्व करंडकासाठी चा अंतिम सामना असेल आणि तो आपल्या देशाने जिंकला तर तो अंतिम सामना खेळणारे ११ खेळाडू देशवासियांच्या गळ्यातील ताईत बनतात. आपल्या देशातील १३० कोटी जनता आपल्या या रियल हिरोंना अक्षरशः डोक्यावर घेते. हे आतापर्यंत आपण तीनदा अनुभवले आहे. प्रथम कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भारतीय संघाने एक दिवसीय विश्व करंडक पटकावला होता. नंतर महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली प्रथम २०-२० विश्व करंडक पटकावला व त्यानंतर काही वर्षांनी एक दिवसीय विश्वकरंडक ही पटकावला. त्यावेळी जसा विश्वकरंडकाचा हा अंतिम सामना होता तसाच क्रिकेट रसिकांसाठी देव ठरलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचाही अंतिम सामना होता. हा सामना जिंकून भारतीय संघाने विश्व करंडक पटकावला. या तिन्ही वेळी क्रिकेटच्या या ११ हिरोंचे आणि राखीव असलेल्या अन्य खेळाडूंचे आपल्या देशातील जनतेने भरभरून स्वागत केले होते. कारण या खेळाडूंनी आपल्या देशाचे नाव जागतिक पातळीवर उज्वल केले होते. मात्र बिल्कीस बानो अत्याचार प्रकरणातील दोषी ११ जन आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असताना त्यांनी असा कोणता पराक्रम केला की, त्यांची आजन्म कारावासाची शिक्षा माफ करून मोठ्या थाटात त्यांना तुरुंगाबाहेर सोडून देण्यात आले ? शिवाय त्यांचे फुलहार घालून औक्षण करण्यात आले. त्यांनी फार मोठा पराक्रम करून आपल्या भारत देशाला विश्व करंडक जिंकून दिला की काय ? असा प्रश्न ही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे चोख नियोजन !हजारोंच्या संख्येने मूक मोर्चा काढण्यास मराठा क्रांती मोर्चा पासून सुरुवात झालेली आहे. यातून अनेकांनी आदर्श घेतला असून १५ सप्टेंबरला काढण्यात आलेल्या या मुस्लिम महिला मोर्चाचे चोख नियोजन सुद्धा जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनासह सामाजिक कार्यकर्त्यांनी केले. किल्ला मैदान येथून निघालेल्या मोर्चाचे समोरील टोक जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या शांततेत पोहोचले तेव्हा शेवटचे टोक हे किल्ला मैदानावरच होते. हे अंतर जवळपास दोन किलोमीटर आहे. यावरून मोर्चात मुस्लिम महिला किती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हे लक्षात येते. हजारोंच्या संख्येने असलेल्या मुस्लिम महिला आणि नियोजन करणारे सामाजिक कार्यकर्ते व तरुण या सर्वांनी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून हा मोर्चा ही मराठा क्रांती मोर्चा सारखा अत्यंत शांततेने व सौम्यतेने कोणतीही घोषणाबाजी न करता यशस्वी करून दाखविला. यासाठी मोर्चेकर्यांसह जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते मराठा क्रांती मोर्चा सारखेच कौतुकास पात्र ठरले.राजकीय पक्षांची लागण झाली नाही !मराठा क्रांती मोर्चा सारखाच हा मुस्लिम महिलांचाही मूक मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये मुस्लिम महिलांसह मुस्लिम बांधव व तरुण सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे यातून बरेच जण अनेक पक्षाचे नेते व कार्यकर्ते सुद्धा होते. परंतु या सर्वांनी आपापला पक्षीय चोला बाजूला ठेवून मोर्चात सहभाग नोंदविला. शिवाय मोर्चेकर्यांनी ठरविल्याप्रमाणे कोणत्याच पक्षाच्या नेत्याने किंवा कार्यकर्त्याने स्वतःचा किंवा आपल्या पक्षाचा उदो-उदो करून घेतला नाही. तशी मोर्चेकऱ्यांनी अगोदरच सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांना ताकीद दिली होती. या ताकीदची यशस्वीपणे अंमलबजावणी झाल्याने मुस्लिम महिलांच्या या मोर्चाला सुद्धा मराठा क्रांती मोर्चा सारखीच कोणत्याही राजकीय पक्षाची लागण झाली नाही.बीड जिल्ह्यातील हा मोर्चा राज्यातच नव्हे तर देशात आदर्श ठरणार !मराठा आरक्षणासाठी जसे प्रथम औरंगाबाद येथून मराठा क्रांती मोर्चास सुरुवात झाली होती. त्याचे पडसाद महाराष्ट्रासह देशभरात उमटले होते. यातून आदर्श घेत देशभरातील प्रत्येक तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे मूक मोर्चे रेकॉर्ड ब्रेक गर्दीने यशस्वी झाले होते. आता अशाच प्रकारे मुस्लिम महिलांच्या मूक मोर्चास सुरुवात झाली असून बिल्कीस बानोवर अत्याचार करणाऱ्या दोषींना जोपर्यंत पुन्हा तुरुंगात डांबले जात नाही तोपर्यंत मुस्लिम महिलांचे असे मूक मोर्चे महाराष्ट्र राज्यासह देशभरात एका नंतर एक निघतील यात दुमत नाही. याची सुरुवात बीड शहरासह बीड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून झाली आहे. याचा आदर्श निश्चितपणे देशभरात घेतला जाईल हे नक्की.
गुजरात राज्यातील बिल्कीस बानो अत्याचार प्रकरणात आजन्म करावासाची शिक्षा भोगत असलेल्या ११ दोषींना गुजरात सरकारने त्यांची शिक्षा माफ करून काही दिवसांपूर्वी तुरुंगातून सोडून दिले. एवढेच नाही तर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांच्याबद्दल स्तुती सुमने उधळून त्यांना फुल-हार घालत त्यांचे औक्षण करण्यात आले. या निर्णयाबाबत संपूर्ण भारतात आता हळूहळू तीव्र प्रतिक्रिया उमटत असून याची सुरुवात बीड जिल्ह्यातून गुरुवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी झाली. बीड शहराच्या इतिहासात कधी नव्हे ते मुस्लिम महिलांनी हजारोंच्या संख्येने एकञ येऊन किल्ला मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अगदी शांततेत मोठ्या शिस्तीने मूक मोर्चा काढून बिल्कीस बानो वर अत्याचार केलेल्या दोषींना झालेली आजन्म कारावासाची शिक्षा भोगण्यासाठी पुन्हा कारागृहात पाठविण्यात यावे अशी मागणी केली. याची दखल सोशल मीडिया, प्रेस मीडियासह वृत्तवाहिन्यांनीही घेतली.
माञ इंडिया टीव्हीने “ध” चा “मा” करत केला खोडसाडपणा !
मुस्लिम महिलांनी ज्यासाठी मोर्चा काढला होता, त्याचा जो आशय व सार होता त्याला बगल देत इंडिया टीव्ही नामक वृत्तवाहिनीने
“ध” चा “मा” करत भलतेच वृत्त प्रसारित केले. या वृत्तामुळे आपल्या भारत देशात गुण्यागोविंदाने राहत असलेल्या सर्वधर्मीय बांधवांमध्ये उभी फूट पाडण्याचे षड्यंत्र स्पष्ट दिसून आले. अगोदरच अत्याचारी-दुराचारी ११ दोषींना गुजरात सरकारने शिक्षा माफ करत तुरुंगातून सोडून दिल्याने जनक्षोभ वाढत असताना त्यावर तेल ओतण्याचे कार्य इंडिया टीव्ही नामक वृत्तवाहिनीने केले आहे.
क्रिकेट आणि दोषीत ११ चा योगायोग …..
आपल्या भारत देशात सर्वात जास्त लोकप्रिय असलेला खेळ म्हणजे क्रिकेट. १३० कोटी जनतेच्या देशाचा आपला भारतीय संघ ११ खेळाडूंसह खेळण्यासाठी जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा प्रत्येक क्रिकेट प्रेमी जीव की प्राण होऊन टीव्ही समोर बसून सामना पाहतात. आपला संघ जिंकला की मोठ्या प्रमाणात फटाके ही फोडले जातात. जर क्रिकेटच्या विश्व करंडकासाठी चा अंतिम सामना असेल आणि तो आपल्या देशाने जिंकला तर तो अंतिम सामना खेळणारे ११ खेळाडू देशवासियांच्या गळ्यातील ताईत बनतात. आपल्या देशातील १३० कोटी जनता आपल्या या रियल हिरोंना अक्षरशः डोक्यावर घेते. हे आतापर्यंत आपण तीनदा अनुभवले आहे. प्रथम कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भारतीय संघाने एक दिवसीय विश्व करंडक पटकावला होता. नंतर महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली प्रथम २०-२० विश्व करंडक पटकावला व त्यानंतर काही वर्षांनी एक दिवसीय विश्वकरंडक ही पटकावला. त्यावेळी जसा विश्वकरंडकाचा हा अंतिम सामना होता तसाच क्रिकेट रसिकांसाठी देव ठरलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचाही अंतिम सामना होता. हा सामना जिंकून भारतीय संघाने विश्व करंडक पटकावला. या तिन्ही वेळी क्रिकेटच्या या ११ हिरोंचे आणि राखीव असलेल्या अन्य खेळाडूंचे आपल्या देशातील जनतेने भरभरून स्वागत केले होते. कारण या खेळाडूंनी आपल्या देशाचे नाव जागतिक पातळीवर उज्वल केले होते. मात्र बिल्कीस बानो अत्याचार प्रकरणातील दोषी ११ जन आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असताना त्यांनी असा कोणता पराक्रम केला की, त्यांची आजन्म कारावासाची शिक्षा माफ करून मोठ्या थाटात त्यांना तुरुंगाबाहेर सोडून देण्यात आले ? शिवाय त्यांचे फुलहार घालून औक्षण करण्यात आले. त्यांनी फार मोठा पराक्रम करून आपल्या भारत देशाला विश्व करंडक जिंकून दिला की काय ? असा प्रश्न ही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे चोख नियोजन !
हजारोंच्या संख्येने मूक मोर्चा काढण्यास मराठा क्रांती मोर्चा पासून सुरुवात झालेली आहे. यातून अनेकांनी आदर्श घेतला असून १५ सप्टेंबरला काढण्यात आलेल्या या मुस्लिम महिला मोर्चाचे चोख नियोजन सुद्धा जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनासह सामाजिक कार्यकर्त्यांनी केले. किल्ला मैदान येथून निघालेल्या मोर्चाचे समोरील टोक जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या शांततेत पोहोचले तेव्हा शेवटचे टोक हे किल्ला मैदानावरच होते. हे अंतर जवळपास दोन किलोमीटर आहे. यावरून मोर्चात मुस्लिम महिला किती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हे लक्षात येते. हजारोंच्या संख्येने असलेल्या मुस्लिम महिला आणि नियोजन करणारे सामाजिक कार्यकर्ते व तरुण या सर्वांनी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून हा मोर्चा ही मराठा क्रांती मोर्चा सारखा अत्यंत शांततेने व सौम्यतेने कोणतीही घोषणाबाजी न करता यशस्वी करून दाखविला. यासाठी मोर्चेकर्यांसह जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते मराठा क्रांती मोर्चा सारखेच कौतुकास पात्र ठरले.
राजकीय पक्षांची लागण झाली नाही !
मराठा क्रांती मोर्चा सारखाच हा मुस्लिम महिलांचाही मूक मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये मुस्लिम महिलांसह मुस्लिम बांधव व तरुण सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे यातून बरेच जण अनेक पक्षाचे नेते व कार्यकर्ते सुद्धा होते. परंतु या सर्वांनी आपापला पक्षीय चोला बाजूला ठेवून मोर्चात सहभाग नोंदविला. शिवाय मोर्चेकर्यांनी ठरविल्याप्रमाणे कोणत्याच पक्षाच्या नेत्याने किंवा कार्यकर्त्याने स्वतःचा किंवा आपल्या पक्षाचा उदो-उदो करून घेतला नाही. तशी मोर्चेकऱ्यांनी अगोदरच सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांना ताकीद दिली होती. या ताकीदची यशस्वीपणे अंमलबजावणी झाल्याने मुस्लिम महिलांच्या या मोर्चाला सुद्धा मराठा क्रांती मोर्चा सारखीच कोणत्याही राजकीय पक्षाची लागण झाली नाही.
बीड जिल्ह्यातील हा मोर्चा राज्यातच नव्हे तर देशात आदर्श ठरणार !
मराठा आरक्षणासाठी जसे प्रथम औरंगाबाद येथून मराठा क्रांती मोर्चास सुरुवात झाली होती. त्याचे पडसाद महाराष्ट्रासह देशभरात उमटले होते. यातून आदर्श घेत देशभरातील प्रत्येक तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे मूक मोर्चे रेकॉर्ड ब्रेक गर्दीने यशस्वी झाले होते. आता अशाच प्रकारे मुस्लिम महिलांच्या मूक मोर्चास सुरुवात झाली असून बिल्कीस बानोवर अत्याचार करणाऱ्या दोषींना जोपर्यंत पुन्हा तुरुंगात डांबले जात नाही तोपर्यंत मुस्लिम महिलांचे असे मूक मोर्चे महाराष्ट्र राज्यासह देशभरात एका नंतर एक निघतील यात दुमत नाही. याची सुरुवात बीड शहरासह बीड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून झाली आहे. याचा आदर्श निश्चितपणे देशभरात घेतला जाईल हे नक्की.
जरात राज्यातील बिल्कीस बानो अत्याचार प्रकरणात आजन्म करावासाची शिक्षा भोगत असलेल्या ११ दोषींना गुजरात सरकारने त्यांची शिक्षा माफ करून काही दिवसांपूर्वी तुरुंगातून सोडून दिले. एवढेच नाही तर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांच्याबद्दल स्तुती सुमने उधळून त्यांना फुल-हार घालत त्यांचे औक्षण करण्यात आले. या निर्णयाबाबत संपूर्ण भारतात आता हळूहळू तीव्र प्रतिक्रिया उमटत असून याची सुरुवात बीड जिल्ह्यातून गुरुवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी झाली. बीड शहराच्या इतिहासात कधी नव्हे ते मुस्लिम महिलांनी हजारोंच्या संख्येने एकञ येऊन किल्ला मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अगदी शांततेत मोठ्या शिस्तीने मूक मोर्चा काढून बिल्कीस बानो वर अत्याचार केलेल्या दोषींना झालेली आजन्म कारावासाची शिक्षा भोगण्यासाठी पुन्हा कारागृहात पाठविण्यात यावे अशी मागणी केली. याची दखल सोशल मीडिया, प्रेस मीडियासह वृत्तवाहिन्यांनीही घेतली.माञ इंडिया टीव्हीने “ध” चा “मा” करत केला खोडसाडपणा !मुस्लिम महिलांनी ज्यासाठी मोर्चा काढला होता, त्याचा जो आशय व सार होता त्याला बगल देत इंडिया टीव्ही नामक वृत्तवाहिनीने “ध” चा “मा” करत भलतेच वृत्त प्रसारित केले. या वृत्तामुळे आपल्या भारत देशात गुण्यागोविंदाने राहत असलेल्या सर्वधर्मीय बांधवांमध्ये उभी फूट पाडण्याचे षड्यंत्र स्पष्ट दिसून आले. अगोदरच अत्याचारी-दुराचारी ११ दोषींना गुजरात सरकारने शिक्षा माफ करत तुरुंगातून सोडून दिल्याने जनक्षोभ वाढत असताना त्यावर तेल ओतण्याचे कार्य इंडिया टीव्ही नामक वृत्तवाहिनीने केले आहे.क्रिकेट आणि दोषीत ११ चा योगायोग …..आपल्या भारत देशात सर्वात जास्त लोकप्रिय असलेला खेळ म्हणजे क्रिकेट. १३० कोटी जनतेच्या देशाचा आपला भारतीय संघ ११ खेळाडूंसह खेळण्यासाठी जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा प्रत्येक क्रिकेट प्रेमी जीव की प्राण होऊन टीव्ही समोर बसून सामना पाहतात. आपला संघ जिंकला की मोठ्या प्रमाणात फटाके ही फोडले जातात. जर क्रिकेटच्या विश्व करंडकासाठी चा अंतिम सामना असेल आणि तो आपल्या देशाने जिंकला तर तो अंतिम सामना खेळणारे ११ खेळाडू देशवासियांच्या गळ्यातील ताईत बनतात. आपल्या देशातील १३० कोटी जनता आपल्या या रियल हिरोंना अक्षरशः डोक्यावर घेते. हे आतापर्यंत आपण तीनदा अनुभवले आहे. प्रथम कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भारतीय संघाने एक दिवसीय विश्व करंडक पटकावला होता. नंतर महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली प्रथम २०-२० विश्व करंडक पटकावला व त्यानंतर काही वर्षांनी एक दिवसीय विश्वकरंडक ही पटकावला. त्यावेळी जसा विश्वकरंडकाचा हा अंतिम सामना होता तसाच क्रिकेट रसिकांसाठी देव ठरलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचाही अंतिम सामना होता. हा सामना जिंकून भारतीय संघाने विश्व करंडक पटकावला. या तिन्ही वेळी क्रिकेटच्या या ११ हिरोंचे आणि राखीव असलेल्या अन्य खेळाडूंचे आपल्या देशातील जनतेने भरभरून स्वागत केले होते. कारण या खेळाडूंनी आपल्या देशाचे नाव जागतिक पातळीवर उज्वल केले होते. मात्र बिल्कीस बानो अत्याचार प्रकरणातील दोषी ११ जन आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असताना त्यांनी असा कोणता पराक्रम केला की, त्यांची आजन्म कारावासाची शिक्षा माफ करून मोठ्या थाटात त्यांना तुरुंगाबाहेर सोडून देण्यात आले ? शिवाय त्यांचे फुलहार घालून औक्षण करण्यात आले. त्यांनी फार मोठा पराक्रम करून आपल्या भारत देशाला विश्व करंडक जिंकून दिला की काय ? असा प्रश्न ही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे चोख नियोजन !हजारोंच्या संख्येने मूक मोर्चा काढण्यास मराठा क्रांती मोर्चा पासून सुरुवात झालेली आहे. यातून अनेकांनी आदर्श घेतला असून १५ सप्टेंबरला काढण्यात आलेल्या या मुस्लिम महिला मोर्चाचे चोख नियोजन सुद्धा जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनासह सामाजिक कार्यकर्त्यांनी केले. किल्ला मैदान येथून निघालेल्या मोर्चाचे समोरील टोक जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या शांततेत पोहोचले तेव्हा शेवटचे टोक हे किल्ला मैदानावरच होते. हे अंतर जवळपास दोन किलोमीटर आहे. यावरून मोर्चात मुस्लिम महिला किती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हे लक्षात येते. हजारोंच्या संख्येने असलेल्या मुस्लिम महिला आणि नियोजन करणारे सामाजिक कार्यकर्ते व तरुण या सर्वांनी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून हा मोर्चा ही मराठा क्रांती मोर्चा सारखा अत्यंत शांततेने व सौम्यतेने कोणतीही घोषणाबाजी न करता यशस्वी करून दाखविला. यासाठी मोर्चेकर्यांसह जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते मराठा क्रांती मोर्चा सारखेच कौतुकास पात्र ठरले.राजकीय पक्षांची लागण झाली नाही !मराठा क्रांती मोर्चा सारखाच हा मुस्लिम महिलांचाही मूक मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये मुस्लिम महिलांसह मुस्लिम बांधव व तरुण सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे यातून बरेच जण अनेक पक्षाचे नेते व कार्यकर्ते सुद्धा होते. परंतु या सर्वांनी आपापला पक्षीय चोला बाजूला ठेवून मोर्चात सहभाग नोंदविला. शिवाय मोर्चेकर्यांनी ठरविल्याप्रमाणे कोणत्याच पक्षाच्या नेत्याने किंवा कार्यकर्त्याने स्वतःचा किंवा आपल्या पक्षाचा उदो-उदो करून घेतला नाही. तशी मोर्चेकऱ्यांनी अगोदरच सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांना ताकीद दिली होती. या ताकीदची यशस्वीपणे अंमलबजावणी झाल्याने मुस्लिम महिलांच्या या मोर्चाला सुद्धा मराठा क्रांती मोर्चा सारखीच कोणत्याही राजकीय पक्षाची लागण झाली नाही.बीड जिल्ह्यातील हा मोर्चा राज्यातच नव्हे तर देशात आदर्श ठरणार !मराठा आरक्षणासाठी जसे प्रथम औरंगाबाद येथून मराठा क्रांती मोर्चास सुरुवात झाली होती. त्याचे पडसाद महाराष्ट्रासह देशभरात उमटले होते. यातून आदर्श घेत देशभरातील प्रत्येक तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे मूक मोर्चे रेकॉर्ड ब्रेक गर्दीने यशस्वी झाले होते. आता अशाच प्रकारे मुस्लिम महिलांच्या मूक मोर्चास सुरुवात झाली असून बिल्कीस बानोवर अत्याचार करणाऱ्या दोषींना जोपर्यंत पुन्हा तुरुंगात डांबले जात नाही तोपर्यंत मुस्लिम महिलांचे असे मूक मोर्चे महाराष्ट्र राज्यासह देशभरात एका नंतर एक निघतील यात दुमत नाही. याची सुरुवात बीड शहरासह बीड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून झाली आहे. याचा आदर्श निश्चितपणे देशभरात घेतला जाईल हे नक्की.

