बीड ; एका ३६ वर्षीय विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दि . ११ सप्टेंबर रोजी शहरातील बीड मामला मोमीनपुरा भागात घडली . या प्रकरणी मयत विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पती शेख हाफीज अश्फाक शेख पाशा , सासू नगरसेविका शेख बिस्मील्लाबी शेख पाशा यांच्यासह पाच जणांविरूध्द पेठ बीड पोलीस ठाण्यात आत्महत्येत प्रवृत्त केल्यासह इतर कलमान्वये – गुन्हा दाखल झाला आहे . बीड शहरातील बीड मामला मोमीनपुरा भागातील शेख शहाना शेख अश्फाक ( वय ३६ ) या विवाहितेने पतीसह सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून दि . ५ सप्टेंबर रोजी विष प्राशन केले . त्यांना तातडीने औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल केले असता ११ सप्टेंबर रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला . या प्रकरणी मयत विवाहितेचे भाऊ शेख जावेद शेख उस्मान यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , मयत शहाना हिचा पती शेख अश्फाक याचे नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते . त्या महिलेच्या सांगण्यावरून तो शहाना हिस दररोज मारहाण करत होता . पैशांची मागणी करून शारिरीक व मानसिक छळ करत होता . फारकत घेण्यासाठी दबाव टाकुन जिवे मारण्याची धमकी देत होता . या सर्व प्रकारामुळे आणि सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळुन शहाना हिने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे म्हटले आहे . त्या अनुषंगाने पती शेख अश्फाक शेख पाशा , सासू शेख बिस्मील्लाबी बेगम शेख पाशा , दीर शेख अफसर शेख पाशा , ननंद शेख शाहीन बेगम शेख बबलु आणि आयशा शेख आरेफ या पाच जणांविरूध्द पेठ बीड पोलीस ठाण्यात कलम ३०६,४ ९ ८ अ , ३२३ , ५०४ , ५०६ , ३४ भांदवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पोलीस करत आहेत .
विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या
RELATED ARTICLES