HomeUncategorizedखा.प्रितमताईंची जहाँगीर फौंडेशनच्या कार्यक्रमातुन भावी डॉक्टरांच्या पाठीवर कौतुकाची थाप

खा.प्रितमताईंची जहाँगीर फौंडेशनच्या कार्यक्रमातुन भावी डॉक्टरांच्या पाठीवर कौतुकाची थाप

बीड : विद्यार्थ्यांनी मोठ्या मेहनतीने आणि जिद्दीने मिळवलेले यश त्यांच्या पालकांसाठीच नव्हे तर समाजासाठी देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.भविष्यात आपल्या सर्वांच्या हातून समाजाची सेवा होणार असल्याचे सांगून कौतुक आणि शुभेच्छा असा दुहेरी संगम सलीम जहाँगीर यांनी या सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून घडवून आणला आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते आणि भावी डॉक्टरांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देते असा शब्दात बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी भावना व्यक्त केल्या.बीड येथील गोल्डन चॉईस हॉटेलमध्ये नीट उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा जहांगीर फाउंडेशनच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी लोकप्रिय खासदार डॉ. पप्रितमताई मुंडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय प्रभारी डॉ. चंद्रकांत मुळे , मिलिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहम्मद इलियास फाजील, ज्येष्ठ संपादक काजी मगदूम , जेडी शाह , देविदास नागरगोजे, नवनाथ शिराळे , स्वप्निल गलधर , भगीरथ बियाणी , चंद्रकांत फड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जहाँगीर फाउंडेशनच्या वतीने नीट उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. खासदार डॉ.प्रितमताई यांनी आपल्या भाषणातून स्वतःच्या शैक्षणिक आठवणी सांगितल्या. पेशाने डॉक्टर असलेल्या खासदार प्रितमताईंनी त्यांच्या वैद्यकीय तसेच शैक्षणिक कारकीर्दीचा आढावा उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना सांगितला. सामान्य मुलींप्रमाणेच माझेही शिक्षण झाल्याचे स्पष्ट करत खा. ताईंनी आयुष्यात कधीच कॉपी न करता स्वकर्तुत्वावर डॉक्टर ते खासदार हा प्रवास उपस्थित विद्यार्थी आणि पालकांसमोर मांडला. नीट उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्रथमच अशा स्वरूपाचा भव्य दिव्य सत्कार सोहळा आयोजित केल्याबद्दल खा.प्रितमताई मुंडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आणि पालकांनीही सलीम जहाँगीर यांच्या उपक्रमाला दाद दिली. हा पुरस्कार सोहळा नीट उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्साह वाढविणारा आणि प्रेरणादायी असल्याच्या भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमास डॉ. लक्ष्मण जाधव ,सुनील मिसाळ, संदीप उबाळे , संग्राम बांगर, दीपक थोरात,मिराताई गांधले,गणेश पुजारी, प्रदिप बांगर, दत्ता परळकर, विलास बामणे,कपिल सौदा,कृष्णा तिडके, प्राध्यापक बाळासाहेब गव्हाणे,नागेश पवार, छाया मिसाळ,शीतल राजपूत , लता मस्के ,संतोष राख , प्रीती कुकडेजा, अडडू जहागिरदार , ए. स.गोलू , बालाजी पवार यांच्यासह बीड शहरातील डॉक्टर , वकील , इंजिनिअर, प्राचार्य, शिक्षक , मुख्याध्यापक इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जहांगीर एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने सलीम जहाँगीर ,अलीम जहाँगीर ,कलीम जहाँगीर , शेख फय्याज, शेख तकी , ॲड. शेख फैरोज , मुसा खान पठाण , नुर लाला खान, रियाज सिद्दीकी , आमेर बेग, सोहेल बेग , असिफ शेख यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments