HomeUncategorizedविद्यार्थीनीचा अपहरणाचा प्रयत्न फसला

विद्यार्थीनीचा अपहरणाचा प्रयत्न फसला

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] येथील ५ व्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या १० वर्षीय विद्यार्थीला काळ्या ओमनी मधुन आलेल्या २ पुरुष १ स्त्री तिघांनी संगमत करुन एका अपहरण कर्ते महिलेने मुलीचा हात पकडून ओमनीत ओढत असतांना अल्पवयीन मुलीने अपहरण कर्त्या स्त्रीच्या हाताला चावा घेतल्याने अपहरणाचा प्रयत्न फसला या बाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि संग्रामपुर येथील रहिवासी तथा परभणी जिल्ह्यातील वसमत येथे नांदुरा अर्बन बॅकेत कर्मचारी विनोद राऊत यांची ५ व्या वर्गात शिक्षण घेणारी १० वर्षीय मुलगी आजोबा कडे राहते नेहमी प्रमाणे शाळेत जात असतांना आज शनिवार दिवशी सकाळची शाळा असल्याने अंदाजे १० वाजता घरून शाळेत जाण्यासाठी निघाली मैत्रीनी आजारी असल्याने एकटीच शाळेत जात असतांना आनंद माता मंदिर डॉ सुरतकार हॉस्पीटल जवळ काळ्या रंगाची ओमनीतुन २ पुरुष १ स्त्री आले व स्त्रीने मुलीचा हात धरुन ओमनीत ओढत असतांना मुलीने त्या स्त्रीच्या हाताला चावा घेतल्याने अपहरणाचा प्रयत्न फसला घाबलेल्या अवस्थेत मुली पळत शाळेत पोहचल्यावर घडलेला प्रकार शिक्षकांना सांगितला मात्र शिक्षकांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याने अपहरण कर्ते पळून गेले शिक्षकांनी कार्यतत्परता दाखवुन पोलीसांना माहिती दिली असती तर अपहरण कर्ते जेरबंद झाले असते सदर घटनेमुळे खळबळ उडाली असुन पालक वर्गात दहशत पसरली आहे वृत लिहे पर्यत तामगाव पोलीसात अपहरणचा प्रयत्न झालेल्या अल्पवयीन मुलीच्या संबंधीत नातेवाईक तक्रार नोदविण्याची प्रक्रिया सुरु होती

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments