HomeUncategorizedआक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकावर गुन्हा दाखल करत कठोर शासन करा - सर्व...

आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकावर गुन्हा दाखल करत कठोर शासन करा – सर्व मुस्लिम समाज

बीड : परळी येथील एका इसमाने सबंध मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतूने त्याच्या खाजगी फेसबुक खात्यावरून एक आक्षेपहार्य पोस्ट केली त्या पोस्ट मधून त्याने मुस्लिम धर्मियांच्या दैवताबद्दल असे विधान पोस्ट केले की दोन समाजात तेढ निर्माण होईल आणि समाजासमाजात भांडण निर्माण होईल असे काम त्याने त्याचा पोस्ट मार्फत केले,त्याच्या त्या विधानाने मुस्लिम समाजाच्या भावना या प्रचंड दुखावल्या गेल्या आहेत,मुस्लिम समाजाच्या सर्वोच्च दैवाताबद्दल असे वक्तव्य करणाऱ्या आणि सामाजिक शांतता,आणि सौहार्द बिघडवणाऱ्या अश्या माथेफिरूना कायद्याचा बडगा दाखवण्याची आता वेळ आली आहे ,दर रोज कोणी ना कोणी मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करतो कारण की त्यांना कायद्याचा धाकच उरलेला दिसत नाही म्हणूनच अश्या प्रवृत्तींवर कडक आणि कठोर कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करावा ,आणखीन काही कठोर कलम त्या आरोपीवर लावण्यात यावेत जेणे करून या पुढे अश्या घटना घडणार नाहीत, आणि या नंतर असे करणाऱ्यांना ही एक समज मिळेल या सर्व मागण्यांचे एक शिष्टमंडळ शहरातील पेठ बीड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केदारनाथ पालवे यांना भेटून त्यांना या सर्व मागण्यांचे एक निवेदन सादर करण्यात आले यावेळी ,खुर्शीद आलम,सय्यद इलियास , सूफियान मनियार,जाफर इनामदार,समीर सरकार, अरबाज इनामदार, माजेद कुरेशी,शाहनवाज खान,समीर पठान,जफर सय्यद,आमेर काज़ी,अशफाक शेख, शेख अखिल,सय्यद मोईज,शेर खान,सय्यद इब्राहिम, शेख असलम, शेख , इकबाल भाऊ, इरफान कुरेशी,नदीम,मुज्जू,रुस्तुम पठाण, शाहनवाज बॉस,मोमिन अखिल,नविद इनामदार,अतीक शेख, शेख वाजेद ,आदिंची उपस्तिथि होती

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments