HomeUncategorizedमांजरसुंभा - अंबाजोगाई रोड बनला मृत्युचा सापळा

मांजरसुंभा – अंबाजोगाई रोड बनला मृत्युचा सापळा

मांजरसुंभा – अंबाजोगाई रोडवर अपघाताचे सञ संपताना दिसत नाही.हा रोड म्हणजे मृत्युचा सापळा बनला असुन अपघाताचे प्रमाण वाढतच आहे.दररोज अपघात घडत असून आज शनिवारी दि.०३-०९-२०२२रोजी ११-०० वाजता मांजरसुंभा-अंबाजोगाई रस्त्यावर डोणगांव फाट्याजवळ एका पिकअप व दुचाकीचा अपघात घडला.या घटनेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी आहेत.जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून केज येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले. बीड जिल्ह्यातील नवीन महामार्ग झाले परंतु या रस्त्यांवर सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना नाही. यामुळे जिल्ह्यातील अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आज शनिवारी सकाळी ११-०० वाजण्याच्या सुमारास मांजरसुंभा – अंबाजोगाई रस्त्यावर डोनगाव फाट्यावर एका स्नॅक्स सेंटर जवळ पिकअप क्रमांक एम.एच. २४ ए यू ५६७० या चालकाने भरधाव वेगात दुचाकी क्रमांक एम.एच. ४४ आर ९१२४ ला जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.तसेच दुचाकीला धडक देऊन पिकअप ही रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाला आहे. यामध्ये पिकअप चालकही जखमी झाला आहे. अपघात घडताच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी १०८ ला फोन केला. रुग्णवाहिकेतून जखमींना केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच केज पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींची नाव अद्याप समजू शकलेले नाहीत परंतु अपघात टाळण्यासाठी रोडवर गतीरोधक बसवावेत अशी मागणी नागरीक करीत आहेत .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments