बीड : गुजरात दंगलीत गरोदार बिलकिसबानो गँग रेप व तीन वर्षाच्या लहान मुलीसह कुटुंबातील सदस्यांची अमानुषपणे हत्या करणाऱ्या आरोपी अाजन्म शिक्षा भोगत असताना व देश स्वतंत्रतेचा पंच्यात्तरवा स्वर्ण महोत्सव साजरा करत असताना गुजरात सरकार व केंद्रीय गृह मंत्रालयाने वरील अकरा आरोपींची शिक्षा माफ करुन त्यांना बरी करुन टाकले गुजरात सरकार व केंद्रीय गृहमंत्रालयाच्या या निर्णयाविरोधात उद्या गुरुवारी 1 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर होणाऱ्या चलेजाव (धरणे) आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लोकसेना संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष सुफियान मनियार यांनी केले आहे. 15 अगस्त रोजी देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव साजरा करत होता या दिवशी देशाचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी साहेबांनी देशाला संबोधित करताना महिला सन्मान व सशक्तीकरणासाठी देशाला आव्हान केले त्याच दिवशी गुजरात सरकार व केंद्रीय गृहमंत्रालयाने बलात्कार व नरसंहार सारख्या गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत आलेल्या 11 नराधम आरोपींना माफी देऊन सुटका केली. हा निर्णय माणूसकीला काळीमा फासणारा आहे, देशाच्या न्याय व्यस्था व संविधान विरोधी आहे, बिलकिसबानो बलात्कारातील आरोपीँची शिक्षा माफ करु नये त्यांना कोर्टाने दिलेली शिक्षा कायम ठेवण्यात यावी आरोपींना दिलेली माफी निर्णय रद्द करावा या मागणी साठी व गुजरात सरकार व केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निषेधार्थ दिनांक 01 सप्टेंबर 2022 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता लोकसेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा इलियास इनामदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर चलेजाव (धरणे) आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन लोकसेना संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष सुफियान मनियार, तालुका अध्यक्ष अतीक खान, शहर अध्यक्ष शेख अयाज, यांनी केले आहे.
बिल्कीस बानो वर होत असलेल्या अन्याय विरोधात उद्या होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हा ; सुफियान मनियार
RELATED ARTICLES