HomeUncategorizedधनादेश न वटल्या प्रकरणी आरोपीस तीन महिन्याची शिक्षा

धनादेश न वटल्या प्रकरणी आरोपीस तीन महिन्याची शिक्षा

बीड : फिर्यादीची थोडक्यात हकिकत अशी की, फिर्यादी प्राध्यापक संतोष महादेव तळेकर यांनी आरोपी मोहन बाबुराव शेळके यांच्याकडे जानेवारी २०१८ मध्ये आरोपी चालवत असलेल्या शिवश्री नामक भिशी मध्ये सहभाग घेतला होता. सदर भिशी मध्ये भाग घेतल्यानंतर जुलै मध्ये फिर्यादीने भिशी उचलली सभासदांकडून जमा झालेले एकूण रक्कम रु पाच लाख ५,००,०००/- आरोपीने फिर्यादीस उसनवार म्हणून देण्याची विनंती केली व सदर रक्कम मार्च 2019 मध्ये परत करेल असे सांगितले फिर्यादीने आरोपीवर विश्वास ठेवून सदर रक्कम आरोपीस उसणवार म्हणून दिली. सदर रकमेची मार्च मध्ये फिर्यादीने आरोपिकडे केली अरोपीने सदर रक्कम ३०/०४/२०१९ रोजी (पन्नास हजार रु)५०,०००/- रोख दिले व उर्वरीत रकमेकरीता (चार लाख पन्नास हजार रुपये) ४,५०,०००/- चा धनादेश/चेक दिनांक १७/१०/२०१९ स्वहस्ताक्षरात लिहून फिर्यादीच्या हक्कात दिला. सदर धनादेश दिलेल्या तारखेस वटला जाईल याची हमी दिली. फिर्यादीने सदर धनादेश दिलेल्या तारखेस वटवण्यास टाकला असता सदर धनादेश न वटता परत आला. सदरचा धनादेश न वटता परत आल्याने फिर्यादीने अॅड. सागर नाईकवाडे यांच्या मार्फतिने धनादेशावरील रकमेची मागणी करणारी नोटीस आरोपीस पाठवली. सदर नोटीस आरोपीस मिळून देखील आरोपीने सदर रक्कम फिर्यादिस दिली नाही. त्यानंतर फिर्यादीने अॅड. सागर नाईकवाडे यांच्या मार्फतीने मा. मुख्य. न्यायदंडाधिकारी बीड यांचे न्यायलयात आरोपीविरुद्ध कलम १३८ एन. आय. अॅक्ट प्रमाणे तक्रार दाखल केली सदर प्रकरणात फिर्यादीतर्फे स्वतःची व इतर दोन साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. सदर प्रकरणात फिर्यादीने दाखल सर्व कागदपत्रांचे अवलोकन करून अॅड. सागर नाईकवाडे यांनी केलेला युक्तिवाद गृहीत धरून मा. अतिरिक्त मुख्य न्यादंडाधिकारी साहेब बीड यांनी जाणीवपूर्वक खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसताना व धनादेशावरील पेमेंट स्टॉप केल्या प्रकरणी आरोपीस धनादेशावरील रक्कम ४५००००/- (चार लाख पन्नास हजार रुपये) तीन महिने कारावासाची शिक्षा दिली.या प्रकरणात फिर्यादीतर्फे अॅड. सागर नाईकवाडे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. राजेश जाधव,अॅड.सुधिर जाधव, अॅड. सतीश गाडे, अॅड. विवेक डोके यांनी सहकार्य केले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments