बीड (प्रतिनिधी) – जिल्हा रुग्णालयातील ओपीडीचे मुख्य प्रवेशद्वार जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुरेश साबळे यांनी सोमवार दिनांक २९ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळच्या सत्रापासून उघडले असून आता ओपीडीच्या दोन्ही सत्रावेळी नियमितपणे उघडले जाईल असे म्हटले आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडी विभागात येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांसह अंध-अपंग रुग्ण व गरोदर महिलांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. याविषयी सविस्तर वृत्त असे की, गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा रुग्णालयातील ओपीडी विभागाचे मेनगेट कुलूप बंद करण्यात आले होते. यामुळे रुग्णांना अतिशय त्रास होत होता. याविषयी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ यांनी प्रसिद्धी माध्यमातून या प्रश्नाला वाचा फोडली होती. ही बातमी *दैनिक ………………….* ने प्रकाशित केली होती. याची दखल घेऊन बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी सोमवार दिनांक २९ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळच्या सत्रापासून ओपीडीचे मेनगेट उघडले. यामुळे रुग्णांना होणारा त्रास संपुष्टात आला आहे.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी आपल्यातील कर्तव्यदक्ष बाणा दाखवून गेल्या ८ वर्ष ८ महिन्यांपासून रुग्णांना होत असलेला त्रास थांबविला आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडी विभागात येणारे रुग्ण व नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडून डॉ. साबळे यांच्यासह मेनगेट उघडावे याकरिता रुग्णांना न्याय मिळवून देण्यासाठी लक्ष वेधणारे मुक्तपञकार एस.एम.युसूफ यांचेही आभार व्यक्त होत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडी मध्ये येणाऱ्या रुग्णांना आंतररुग्ण विभागाकडून लांब वळसा घेत गेल्या जवळपास ९ वर्षांपासून त्रास सहन करावा लागत होता. याची दखल २०१४ पासून घेण्यात येत नव्हती. मात्र सध्या जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे हे जरी प्रभारी असले तरी ते बीड जिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर आल्यापासून ते आतापर्यंत त्यांच्या कर्तव्यदक्ष बाण्यामुळे रुग्णांसाठी जे चांगल्यात चांगले करता येईल ते करण्याकरिता अहोरात्र झटत आहेत. त्यांच्या या कर्तव्यदक्षपणाचा अनुभवही आता ओपीडी विभागात येणाऱ्या रुग्णांना मेनगेट उघडल्याने त्रास कमी झाल्याने येणार आहे. डाॅ. साबळे हे कामानिमित्ताने बाहेर असल्याने मेनगेट उघडताना जातीने जरी उपस्थित राहिले नसले तरी त्यांनी मेनगेट उघडण्याकरिता अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संतोष शहाणे आणि डॉ. ओव्हाळ यांना उपस्थित राहण्यास सांगितले होते. यावरून त्यांच्यातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा प्रत्यय उपस्थितांना आला. यावेळी डॉ. शेख एजाज नॅचरोपॅथीस्ट, कॉलमन परवेज खान पठाण, पोलीस कर्मचारी शेख इब्राहिम, आदमाने, शेख मुबीन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे आणि मुक्तपञकार एस.एम.युसूफ यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा रुग्णालयात ओपीडी रुग्णांचे हाल संपुष्टात ; डाॅ. साबळेंनी उघडले मेनगेट
RELATED ARTICLES