केज : तालुक्यातील लोकनेते स्वर्गीय बाबुरावजी आडसकर यांचा बीड जिल्ह्यातील राजकारणावर मोठा प्रभाव होता .आपल्या ” हाबाडा” या शब्दाची मोहीनी अजुनही कार्यकर्त्यांमध्ये आहे. स्वर्गीय लोकनेते बाबुरावजी आडसकर यांची आपले चिरंजीव श्री.रमेशराव आडसकर हे आमदार व्हावे ही ईच्छा अनेक सभांमधुन बोलुन दाखवली होती .केज विधानसभा मतदारसंघ राखीव प्रवर्गासाठी आरक्षीत असल्यामुळे त्यांना केज विधानसभा मतदारसंघातुन निवडणूक लढता आली नाही पर्यायाने शेजारील माजलगाव मतदारसंघातुन विधानसभेची निवडणूक लढवली. परंतु विद्यमान आमदार प्रकाशराव सोळुंके यांचा विजय झाला .आता शिवसेनेच्या शिंदे गटाची व भाजपची सत्ता आल्यामुळे राज्यपाल नियुक्त बारा आमदार नियुक्तीसाठी हालचालीला सुरुवात झाली असुन अनेक दिग्गज मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत .केज आणी माजलगाव मतदार संघामध्ये आडसकर यांचा प्रभाव असुन भाजपला आपले मतदारसंघ शाबुत राखण्यासाठी रमेश आडसकर यांच्या रुपाने भाजपाला बळकटी येऊ शकते.तसेच रमेशराव आडसकर यांचे शैक्षणिक क्षेञासह सामाजिक कार्यातही मोठा सहभाग असुन त्यांचा राज्यपाल नियुक्त बारा आमदारामध्ये समावेश व्हावा अशी अपेक्षा केज व माजलगाव विधानसभेतील भाजप कार्यकर्त्यांना आहे.उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासु म्हणून रमेश आडसकर यांच्या कडे पाहीले जाते .रमेश आडसकर यांना राज्यपाल नियुक्त आमदारामध्ये समावेश झाला तर लोकनेते स्वर्गीय बाबुरावजी आडसकर यांचे अपुर्ण राहीलेले स्वप्न पुर्णत्वास येईल तसेच केज व माजलगाव विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल . रमेशराव आडसकरांच्या केज येथील निवासाची रंगरंगोटी पुर्ण झाली असल्याने तसेच रमेश आडसकर मुंबईत तळ ठोकून असल्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वर्णी लागते काय ? या कडे जनतेने लक्ष लागलेले आहे.
राज्यपाल नियुक्त आमदार की साठी रमेश आडसकरांचे जोरदार लाॕबींग
RELATED ARTICLES