HomeUncategorizedजुगार अड्ड्यावर छापा 98530 रुपयांचा मुद्देमाल व पाच जुगारींना पकडले ; पाच...

जुगार अड्ड्यावर छापा 98530 रुपयांचा मुद्देमाल व पाच जुगारींना पकडले ; पाच जण फरार

केज : तालुक्यातील उमरी येथे जुगार अड्यावर छापा टाकुन केज पोलीसांनी ९८५३० रुपयांचा मुद्देमाल व पाच जुगारींना रंगेहात पकडले तर पाच जुगारी पलायन करण्यात यशस्वी झाले .या बाबत सविस्तर माहीती अशी की, दि.२३-०८-२०२२ रोजी केज पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना गुप्त खबर्यामार्फत जुगार अड्याबाबत माहीती मिळाली की,उमरी ता.केज या ठिकाणी जुगाराचा खेळ सुरू आहे. खात्री करण्यासाठी पोलीस उप निरीक्षक राजेश पाटील,पोलीस नाईक दिलीप गित्ते,पोलिस नाईक राजू गुंजाळ,पोलीस शिपाई महादेव बहीरवाळ,पोलीस शिपाई शमीम पाशा, पोलीस शिपाई बजरंग इंगोले यांना योग्य त्या सूचना देऊन रवाना केले, सदर ठिकाणी जुगाराचा खेळ सुरू असल्याची खात्री झाल्यावरुन पोलिस उप निरीक्षक पाटील व टीमने छापा मारून १८५३० रुपये रोख व ४०,०००/- रुपये किंमतीच्या दोन मोटारसायकलसह पाच इसमाना ताब्यात घेतले तर पाच इसम फरार झाले.या कारवाई मुळे जुगार खेळणार्यामध्ये दहशत पसरली असुन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालु असुन आणखी जुगारींना अटक करणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments