केज : तालुक्यातील एकुरका येथे पाणी पिण्यासाठी विहीरीत उतरलेला मुलगा पाय घसरून पडला व गटांगळ्या खात असल्याने त्यास वाचविण्यासाठी बापाने उडी घेतली.परंतु दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना केज तालुक्यातील एकुरका येथे घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की,नटराज धस वय ३३ वर्ष ,रोहन (सोनु) नटराज धस वय १३ वर्ष असे मयत बाप-लेकाचे नाव आहे. सोमवारी दि. २२ शाळा सुटल्यावर रोहन शेतात आपल्या वडिलांकडे गेला होता. माळशेत म्हणून ओळखलं जाणाऱ्या राजेभाऊ धस यांच्या शेतातील विहिरीत रोहन पाणी पिण्यासाठी उतरला होता.यावेळी पाय घसरून तो विहिरीत पडला व गटांगळ्या खाऊ लागला. हे पहाताच वडील नटराज यांनी विहिरीत उडी घेऊन रोहनला वाचविण्याचा प्रयत्न केला.परंतु नियतीचा खेळ कुणाला कळला नाही. बाप-लेकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला.घरी कसे आले नाही म्हणून शोध घेण्यास सुरुवात केली. या विहिरी जवळ चप्पल व खाऊं, चॉकलेटचे कागद पडलेले दिसल्याने यामध्ये विहिरीत पडले असतील असा अंदाज व्यक्त करुन अनेक प्रयत्न करुन मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. तो अंदाज खरा ठरला.यावेळी कुटुंबियांच्या आक्रोशाने वातावरण सुन्न झाले. घटनेची माहिती पोलीसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी दवाखान्यात हलविले आहेत.
बापलेकाचा पाण्यात बुडुन दुर्देवी मृत्यु
RELATED ARTICLES