HomeUncategorizedमुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी केली महेदवीया दायरा कब्रस्तानची पाहणी

मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी केली महेदवीया दायरा कब्रस्तानची पाहणी

बीड – शहरात असलेल्या मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानांपैकी एक असलेले मुस्लिम महेदवीया दायरा कब्रस्तान हे समस्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे कब्रस्तान झाले आहे. विशेष म्हणजे हे कब्रस्तान साडेचारशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक कब्रस्तान आहे. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या महेदवीया दायरा कब्रस्तानला आजपर्यंत शासन-प्रशासनाकडून कधीही एक रुपयाचा निधी मिळालेला नाही. किंवा कब्रस्तान ची इतर कोणतीही कामे शासकीय-प्रशासकीय निधीतून कधीच करण्यात आली नाही. अशा या कब्रस्तानला गुरुवार दिनांक १८ ऑगस्ट २०२२ रोजी बीड नगर परिषद चे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी इंजिनिअर अख़ील, सुपरवायझर अमोल बागलाने आणि मोमीनपुरा परिसराचे वॉल मॅन सोबत भेट देऊन पाहणी केली. यावेळी जमाअ्त ए महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटी, बीड चे पदाधिकारी व सदस्यांसह एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष शेख एजाज खन्ना भैय्याही उपस्थित होते.यावेळी जमाअ्त ए महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटी चे सचिव, एल.एम.एम. ग्रुप ग्लोबल चे बीड जिल्हाध्यक्ष तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी महेदवीया दायरा कब्रस्तानच्या समस्या व व्यथा मुख्याधिकारींसमोर मांडल्या. ज्यात प्रामुख्याने जवळपास जमीन दोस्त झालेल्या कब्रस्तानच्या दोन भिंती ज्यांचे बांधकाम करण्याकरिता कमेटीकडे आवश्यक निधी उपलब्ध नाही. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पडलेल्या भिंतीवरून मोठ्या संख्येने बेवारस कुत्री, शेळ्या, मेंढ्या, आदी प्राण्यांनी कब्रस्तान मध्ये शिरून कबरींचे अतोनात नुकसान केले आहे. शिवाय मलमूत्र करतात ते वेगळेच. यापासून वाचण्याकरिता दोन्ही जमीनदोस्त झालेल्या भिंतींचे बांधकाम लवकरात लवकर करणे आवश्यक आहे. या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचे बंदोबस्त मात्र कब्रस्तानात नाही. कब्रस्तान ची विहीर कब्रस्तान च्या बाजूने मोमीनपुरा बायपास रस्ता बनविताना बीड नगर परिषदेकडून बुजविण्यात आली. त्या विहिरीचे पुनरुज्जीवन बीड नगर परिषदेने करून द्यावे. याकरिता गेल्या दोन वर्षांपासून जमाअ्त ए महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटी शासन-प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. या विहिरीचे पुनरुज्जीवन होणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून या विहिरीच्या पाण्याने भिंतीचे बांधकाम तर होईलच शिवाय कब्रस्तान मध्ये मयत दफन करण्याकरिता लागणाऱ्या पाण्याची आणि कब्रस्तानात असलेली हज़रत बंदगी मियाँ सय्यद शाह आलम फ़ानी फिल्ला बाकी बिल्ला रजिअल्ला अन्हा यांच्यासह इतर कबरींच्या ज़ियारतसाठी येणाऱ्या ज़ायरीन (भाविक) साठीही पाण्याची सोय होईल. सध्या तरी विहीर बुजलेली असल्याने पाण्याविना येथे मोठी गैरसोय होत आहे. या बाबीकडे मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावर मुख्याधिकारींनी कमेटीला आश्वस्त केले की, शासन-प्रशासनाकडून महेदवीया दायरा कब्रस्तान साठी जेवढे चांगले करता येईल तेवढे कार्य अवश्य करू. मुख्याधिकारींनी महेदवीया दायरा कब्रस्तानला भेट देऊन पाहणी केली व कब्रस्तान मध्ये असलेल्या गैरसोयींबद्दलचे म्हणणे ऐकून घेतल्याबद्दल कमेटीचे सचिव तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्यांनी मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांचे आभार मानले. यावेळी कमेटी अध्यक्ष परवेज़ मुहम्मद, उपाध्यक्ष शेख अहेमद, मुहम्मद अब्दुल ख़दीर, नज़ीर मुहम्मद, शेख अब्दुल हमीद, अख़ील मुहम्मद, शेख वासेख़ आदींची प्रमुख उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments