केज : येथील अवैद्य धंद्यावर अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर-पवार आणी केज पोलिसांच्या पथकाने संयुक्त करवाई करून मटकाबुक्की घेणारे एजंटासह मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.दि.१८ ऑगस्ट गुरुवार रोजी केज येथील मंगळवार पेठेत मिलन व चेन्नई नाईट नावाचा मटका सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.त्या माहीती वरून अंबाजोगाई विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांच्या आदेशा वरून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे आणी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या पथकातील देवानंद देवकते,शुभम राऊत, बाळासाहेब अहंकारे यांच्या पथकाने मंगळवार पेठेत हॉटेल गुरुकृपा च्या पाठीमागे श्रीराम प्रकाश डबरे व शरद शिवाजी लोंढे हे दोघे मिलन व चेन्नई नाईट नावाचा मटक्याचा जुगार खेळत असताना त्यांना जागीच पकडून त्यांच्या कडून रोख रक्कम १ हजार ५५० रूपये दोन मोबाईल किमत ९ हजार रुपये किंमतीचे असा एकुण १० हजार ५५० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिस नाईक पोलीस अहंकारे जप्त केला.श्रीराम प्रकाश डबरे व शरद शिवाजी लोंढे त्यांच्यावर पोलीस नाईक देवानंद देवकते यांच्यावर जुगार प्रतिबंधक कायद्या नुसार कारवाई केली आहे.अप्पर पोलीस अधीक्षकांच्या धडक कारवाईमुळे केज परिसरातील अवैद्य धंदे चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
