केज : शहरातील बहुचर्चीत प्रकरणातील आरोपीला दहा वर्ष सक्त मजुरी व एक लाख रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा व अतिरिक्त सञ न्यायाधीश -१ अंबाजोगाई न्यायालयाने सुनावली आहे. याबाबत वृत्त असे की, दि.१२/०८/२०२२ रोजी पोलिस स्टेशन केज गुं.र.नं.१९९ /२०१७ कलम ३६३,३७६,३४४, ३४ भा.दं.वी.३,४.पोक्सो अॕक्ट ,स्पेशल पोक्सो प्रकरण नंबर २४/२०१७ आरोपी बाळासाहेब उर्फ खंडु धनंजय वळसे वय २५ वर्ष रा.मंगळवार पेठ, केज ता.केज जि.बीड यास मा.प्रमुख जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश- १ अंबाजोगाई यांनी वरील आरोपीस कलम ३७६ (१)भादवी अन्वये १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व एक लाख रुपये दंड व पीडितेस ७५,००० रुपये व २५,००० रुपये दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी तसेच सदर गुन्ह्यातील आरोपी क्रमांक २ दीपक शंकरराव वळसे यास निर्दोष मुक्त केले.तसेच यात तपासणी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक गाडेवाड,पोलिस उपनिरीक्षक माळी,कोर्ट ड्युटी अंमलदार पोलिस हवालदार एस.बी. सोनटक्के, सरकारी अभियोक्ता अॕड.श्री.आर.एम.ढेले. यांनी काम पाहिले आहे.पिडीत व्यक्तीला न्याय मिळावा हाच उद्देश ठेवुन पोलिस प्रशासन,न्यायपालिका तसेच गुन्ह्यातील ईतर साक्षीदार यांनी न्याय मिळण्याबाबत योग्य ती काळजी तसेच पाठपुरावा केल्याने गुन्ह्यातील नराधमाला शिक्षा मिळाली आहे अशी प्रतिक्रिया सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री .शंकर वाघमोडे यांनी प्रतिनिधीशी वार्तालाप करताना दिली. या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते .
स्पेशल पोक्सो कायद्याअन्वये आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरी व एक लाख रुपये दंडाची शिक्षा
RELATED ARTICLES