केज : तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील महिलेला त्या गावच्या एका शासकीय कर्मचाऱ्यांनी तू माझ्या विरोधात तक्रार का दिली? असे म्हणत तिला लाज वाटेल असे कृत्य करत विनयभंग करत माझ्या सोबत शरीर संबंध कर अशी मागणी करत अश्लिल कृत्य केले असे महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सदरील पिडीत महिलेच्या तक्रारीवरून युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे की केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावच्या महिलेचा नवरा बाहेर गावी गेला असता ती शासकीय कार्यालयात आपल्या घराची कागदपत्रे आणण्यासाठी गेली असता तेथील कर्मचाऱ्यांने माझी तक्रार वरीष्ठाकडे का केली? म्हणत छातीला हात लावून माझ्या सोबत शरीर संबंध ठेव मग तुझे काम करतो असे सांगितले व कोणाला सांगितले तर याद राख अशी धमकी दिली असता. सदर महिला ही तेथुन घरी गेल्यावर आपल्या पतीला व वडलांना सांगून युसुफ वडगाव पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत सध्या तरी तो कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात आला नाही
पोलीसात तक्रार का केली म्हणत महिलेसोबत केले अश्लिल कृत्य
RELATED ARTICLES