HomeUncategorizedशहरातील अर्धवट रस्त्याची कामे पूर्ण करा ; अन्यथा शिवसंग्रामच्या वतीने रास्ता रोको...

शहरातील अर्धवट रस्त्याची कामे पूर्ण करा ; अन्यथा शिवसंग्रामच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

बीड : शहरातील मुख्य व विविध रस्त्याची कामे अर्धवट सोडून दिल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . थोडा पाऊस झाला की चिखलबीड होते व पाऊस उघडला की धुळीने नागरिक त्रस्त होत आहेत. त्यांना श्वसनाचा आजार वाढतो आहे . त्यामुळे शहरातील मुख्य व अन्य रस्त्याचे अर्धवट कामे लवकरात – लवकर पूर्ण करण्यात यावीत यासाठी जिल्हाधिकारी श्री राधाबिनोद शर्मा यांना शिवसंग्रामच्या वतीने निवेदन देण्यात आले . लवकरात -लवकर कामे पूर्ण न केल्यास शिवसंग्रामच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे . बीड शहरातून धुळे-सोलापूर रस्त्याचे काम काही ठिकाणी डांबरीकरण तर काही ठिकाणी सिमेंट काँक्रीटच्या पद्धतीने करण्यात आले आहे परंतु हे काम पूर्ण न करता अर्धवट सोडून देण्यात आलेले आहे . बीड शहरातील बाजीराव जगताप कॉम्प्लेक्स ते बार्शी नाका पर्यंतचे काम बाकी असल्याने वाहनधारकांना व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . जालना रोड मधील सुद्धा काम अर्धवट सोडून दिले आहे तसेच बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकाच्या दोन्हीचारही बाजूंनी सुद्धा हे काम अर्धवट सोडून दिलेले आहे . त्यामुळे थोडा पाऊस झाला की संपूर्ण रस्त्यावरती चिखल होतो आहे व नागरिकांना ये-जा करता येत नाही . विद्यार्थ्यांच्या सायकली चिखलात अडकत आहेत . वाहने चिखलात फसत आहेत व नागरिकांना पायी तर चालता येत नाही . तसेच थोडासा पाऊस उघडला की वाहनाच्या धुळीमुळे विद्यार्थी , महिला व ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास होत आहे नागरिकांना श्वसनाचे आजार होत आहे. तसेच शहरातून जाणाऱ्या बार्शी रोड ते जालना रोडवरील रस्त्याचे दोन्ही 4बाजूचे दुतर्फाचे पंखे पूर्ण भरून घेणे गरजेचे आहे . परंतु रस्त्याचे काम नालीपर्यंत पूर्ण “न ” करता साईटने मध्येच सोडून दिलेले आहेत ते पंखे पूर्ण भरून घेणे गरजेचे आहे . आगामी आठ दिवसात सर्व कामे पूर्ण करण्यात यावीत अन्यथा शिवसंग्रामच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा गर्भित इशारा देण्यात आला आहे याप्रसंगीउपस्थित शिवसंग्रामच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ॲड. मनिषाताई कुपकर , शहराध्यक्ष ॲड.राहुल मस्के उपशहराध्यक्ष शेषेराव तांबे, युवक शहराध्यक्ष प्रशांत डोरले , अल्पसंख्यांक आघाडीचे शहराध्यक्ष अमजद पठाण, शिवसंग्राम नेते मनोज जाधव, अनिकेत देशपांडे सातिराम ढोले, हनुमंत पवार, नदीम भाई ,फारुक भाई नदीम पटेलअनेक कार्यकर्ते व पदाधिकारी निवेदन बहुसंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments