गेवराई : तालुक्यातील शिवशारदा पब्लिक स्कूल, शिवाजीनगर, गढी येथील शाळेतील विद्यार्थी आविष्कार उनवणे याची नुकतीच क्रीडा प्रबोधनी बालेवाडी पुणे, येथे निवड झाली असून सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्रातून १४ वर्षे वयोगटाखालील एक ते दिड हजार विद्यार्थ्यामधून त्याची निवड झाली. आविष्कारची फुटबॉल विभागीय चाचणी औरंगाबाद येथे झाली असून फुटबॉलच्या राज्यस्तरीय चाचणीसाठी निवड होणारा आविष्कार हा शिव शारदा पब्लिक स्कूलचा दुसरा विद्यार्थी आहे. या अगोदर अजय राठोड हा विद्यार्थी या चाचणी साठी पात्र झाला होता. आविष्कार उनवणेची ही वाटचाल कौतुकास्पद असून; तो नक्कीच बीड जिल्हा व शिव शारदा पब्लिक स्कूलचे नाव उच्च शिखरावर पोहचवेल असे सांगून शाळेचे प्राचार्य एन.पी.दत्ता पुढे म्हणाले की,या यशाचे सर्वस्वी श्रेय रणवीर अमरसिंह पंडित यांना जाते. रणवीर पंडित हे स्वतः उत्कृष्ट खेळाडू असून त्यांनी स्वतः मैदानात उतरून शाळेचे विद्यार्थी अजय राठोड व आविष्कार उनवणे यांना फुटबॉलचे प्रशिक्षण दिले आहे. रोज नित्य नियमाने मैदानात येवून शिव शारदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना ते फुटबॉलचे प्रशिक्षण देतात. रणवीर पंडित यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेचे नाव सबंध महाराष्ट्रभर होत आहे असेही प्राचार्य दत्ता म्हणाऊ.आविष्कार उनवणे याच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव (दादा) पंडित, अध्यक्ष अमरसिंह पंडित, सचिव जयसिंग पंडित, माजी जि. प.अध्यक्ष विजसिंह पंडित, पृथ्वीराज पंडित, प्राचार्य एन.पी.दत्ता, क्रीडा शिक्षक नविद माशायक, क्रिडा शिक्षक प्रशांत सिरसट यांनी आविष्कार उनवणे या विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
फुटबॉलच्या राज्यस्तरीय चाचणीसाठी आविष्कार उनवणेची निवड
RELATED ARTICLES