केज : तालुक्यातील सारणी सांगवी येथील मूळ रहिवासी असलेले.डॉ. प्रतापसिंह निवृत्ती सारणीकर यांची जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गात नुकतीच नियुक्ती झाली असून त्यांना सहाय्यक संचालक अधिकारी म्हणून पुणे येथे नियुक्ती मिळाली आहे. डॉ.प्रतापसिंह सारणीकर हे वैद्यकीय अधिकारी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र येळंबघाट येथे सतरा वर्ष कार्यरत होते.या काळामध्ये त्यांनी सर्व राष्ट्रीय कार्यक्रम,कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक आठवड्याला शिबिर तसेच पल्स पोलिओ मोहीम खूप चांगल्या प्रकारे राबवली होती.वेळोवेळी भेटी दिलेल्या पंचायत राज कमिटीने पण त्यांच्या कामाचे कौतुक केले होते. सेवेअंतर्गत पदवीत्तर पदवी एम.डी.पी.एस.एम. हा अभ्यासक्रम त्यांनी पुणे येथे घेऊन येथेच सहाय्यक वैद्यकीय अधिकारी म्हणून ते सध्या कार्यरत होते. त्यांची या निवडीबद्दल अॕड.विजय पंडित,डॉ.विकास जोगदंड,डॉ.हिंगमिरे, डॉ.मुकुंद सुपेकर,डॉ. मिर्झा बेग,डॉ.शार्फ,डॉ. बबन जाधव,आणी तानाजी कदम,सम्राट कदम,बाबासाहेब कदम, कुंडलिक वंजारे,विठ्ठल वंजारे,नानासाहेब काकडे, मधुकर शिरसट,गुलाब शिरसट,विशाल ओव्हाळ यांच्यासह या परिसरातील नागरिक व ग्रामस्थ यांनी त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांची हिवताप सहाय्यक संचालकपदी नियुक्ती
RELATED ARTICLES