बीड : सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या कामाकरिता प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी शिक्षण विभागात केलेले नियोजन कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यचुकारपणामुळे अमलात येत नसल्याने सेवानिवृत्त शिक्षकांच्या निवृत्तीची राहिलेली कामे शिक्षण विभागात दररोज येऊनही होत नसल्याने निवृत्त शिक्षक पार मेटाकुटीस आल्याचे शिक्षण विभागात दिसून येत असल्याने याकडे शिक्षणाधिकारींनी जातीने लक्ष द्यावे असे मुक्तपत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, शिक्षण विभागातील सेवानिवृत्ती विभागाचे काम चांगल्या रीतीने आणि वेळेवर व्हावे म्हणून प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी नियोजन करून सेवानिवृत्त शिक्षकांची कामे निवृत्त शिक्षकांना त्रास न होता पार पाडावी, शिक्षकांना सेवानिवृत्तीचा लाभ लवकर मिळावा म्हणून यासाठी होतकरू तरुण कर्मचाऱ्याची नेमणूक केली होती. हा कर्मचारी दिलेले काम योग्य रीतीने करत असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला. यामुळे उपचारार्थ ते रजेवर गेले.त्यांच्या जागी दुसऱ्या दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यापैकी एक कर्मचारी धार्मिक कार्यक्रमाचे कारण देऊन अनेक दिवसांपासून सुट्टी टाकून गेलेले आहेत तर दुसरे सहकारी कर्मचारी हे औरंगाबादहुन ये-जा करत ड्युटी करत आहेत. मात्र ते ही 30 जुलै पासून शिक्षण विभागातील सेवानिवृत्त विभागात अनुपस्थित आहेत. त्यांनीही सुट्टी टाकली की दांड्या मारीत आहे हे कळायला मार्ग नाही. यामुळे शिक्षकांच्या कामाला, निवृत्तीनंतरच्या लाभाला दप्तर दिरंगाईने होणाऱ्या ससेहोलपटीने शिक्षण विभागात दररोज चकरा मारून निवृत्त शिक्षक पार मेटाकुटीला आले आहेत.अधिकारी कितीही कर्तव्यदक्ष असले तरी त्यांच्या खालचे कर्मचारीही तेवढ्याच तत्परतेने कर्तव्य करणारे असले तरच शासकीय-प्रशासकीय कामे वेळेवर पूर्णत्वास जातात. मात्र बीड जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी हे कर्तव्यदक्ष असले आणि त्यांनी सेवानिवृत्त शिक्षकांसाठी चांगले नियोजन ही केले असले तरी कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे वेळेवर कामे होत नसल्याने त्यांच्या या नियोजनाला हरताळ फासले जात आहे.शिक्षणाधिकाऱ्यांचे चांगले मानस असलेल्या व चांगली सेवा देण्याच्या इच्छेला निवृत्त शिक्षकांना सेवानिवृत्त पुस्तिका निवृत्त होताच मिळावी या चांगल्या हेतूला व धोरणाला कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे खिळ बसली असून यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांच्या मनात कामचुकार कर्मचाऱ्यांबद्दल मोठ्या प्रमाणात असंतोष उफाळत असून याकडे शिक्षणाधिकारींनी लक्ष द्यावे असे मुक्तपत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या नियोजनाला कर्मचाऱ्यांचा खो ; सेवानिवृत्त शिक्षक हेलपाटे मारून मेटाकुटीस
RELATED ARTICLES