HomeUncategorizedआरणगावची आंगनवाडी कागदावरच ; निधी हडपला..!

आरणगावची आंगनवाडी कागदावरच ; निधी हडपला..!

केज : आरणगाव ता.केज येथील आंगणवाडी कागदावरच दिसत असुन शासनाने दिलेला निधी हडपला असुन स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषणाचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.दोषीवर कडक कारवाई करा अन्यथा अरणगावच्या हनुमान मंदिरामध्येच आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहीती तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.ग्रामीण भागांमध्ये अंगण परिसरात चालवली जाणारे माहिती केंद्र म्हणजे अंगणवाडी. ह्यात महिला आणी बालकांच्या सर्वांगीण विकासावर अधिक भर दिला जातो. ३ ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे तसेच माता-बालक ह्यांच्या आरोग्य,आहार,कुपोषण या अन्य बाबींकडे लक्ष पुरवणे अश्या कार्यांचा समावेश अंगणवाडी मध्ये होतो.यासाठी विविध स्तरामधुन अंगनवाडी साठी वेगवेगळ्या कामासाठी तथा बांधकाम करण्यासाठी शासकीय निधी उपलब्ध होतो .मात्र ग्रामगाडा ओढणार्‍या कांही भ्रष्टाचारी कर्मचार्‍यामुळे गावाचा विकास चोरीला जातो.अशीच परिस्थिती केज तालुक्यातील मौजे अरणगाव येथील अंगनवाडीची आहे. सदरील अंगनवाडीचे बांधकाम करण्यासाठी सन २०१५ – २०१६ मध्ये निधी मंजुर झाला होता. सदरील बांधकाम करण्यासाठी ” यश ” कन्ट्रक्शनला काम देण्यात आले होते. मात्र यश कन्ट्रक्शनने अरणगाव येथील अंगनवाडीचे बांधकाम न करताच स्थानिक पुढाऱ्यांना तथा कर्मचार्‍यांना हाताशी धरून कागदावरतीच अंगनवाडीचे बांधकाम दाखवुन लाखो रुपयांचा निधी उचलल्यामुळे दोषीवर कडक कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी ऐन स्वातंत्र्यादिवशीच मौजे अरणगांव येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा केजचे गटविकास अधिकारी तथा केजचे तहसिलदार दुलाजी मेंढके यांना एका निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.सदरील निवेदनावर आश्रुबा शिवाजी भांगे, विकास रामभाऊ राऊत,श्रीराम दत्तु सिरसट ,व्यंकट शिवाजी सिरसट,लक्ष्मण नारायण भांगे,शिवाजी रामकृष्ण सिरसट , महादेव सिताराम ईतापे, विजयकुमार उध्दव भांगे , विशाल रमेश सिरसट, सुंदर दशरथ सिरसट, पोपळे परसराम रामा , आश्रुबा दिलीप इतापे, बाबु इतापे इत्यादींच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments