केज : तालुक्यातील सावळेश्वर पैठण येथील शोभेची दारू पासुन विविध प्रकारचे फटाके बनविण्याचा कारखाना पाथरा शिवारातील सर्वे नंबर आठ मधे असून या कारखान्यात अचानक आग लागल्याने तेथील फटाके,व फटाके बनविण्याचे साहित्य जळुन खाक झाले आहे.या बाबत सविस्तर वृत्त असे की,केज तालुक्यातील युसूफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेख इस्माईल या नावाच्या व्यक्तीचा स्फोटक वस्तु बनविण्याचा कारखाना असुन या कारखान्यात दोन दिवसांपूर्वी अंदाजे रात्री ९ ते ९-३० वाजण्याच्या दरम्यान आग लागली या आगीत तेथील स्फोटक साहित्यासह पत्राचे शेड जळुन खाक झाले आहे. ही आग एवढी भयानक होती की,आगीत सर्व काही भस्मसात झालेआग लागली त्यावेळी कारखान्याचे मालक घटनास्थळी होते.आग लागताच त्यांनी पळ काढत स्वतःचा जीव वाचवला आग विझवण्यासाठी प्रयत्न केला पण आग एवढी तीव्र होती की विझवणे शक्य झाले नाही.सदरील कारखाना बेकायदेशीर असल्याचे बोलले जात असून या स्फोटक कारखान्यामुळे आजुबाजुला असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मागील कांही दिवसापुर्वी केज पोलिसांनी या अवैध कारखान्याच्या मालकावर गुन्हा दाखल करून केज येथील दुकान बंद केले होते या बाबतची माहिती उपलब्ध करण्यासाठी युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी यांना संपर्क साधला असता अजुन आमच्याकडे कोणी आले नसल्याने तक्रार दाखल केली नाही असे सांगितले . सदरील या घटनेमुळे पैठण,पाथरा येथील नागरीकात भितीचे वातावरण तयार झाले असून येथील स्फोटक कारखाना बंद करण्यात यावा अशी चर्चा नागरीक करत आहेत.
