केज : तालुक्यातील टाकळी येथे पिढ्यानपिढ्या रुढी परंपरेनुसार पत्त्याचा जुगार खेळला जातो. याबाबत सविस्तर वृत असे की, केज तालुक्याचे सभापती यांचे गाव असलेले मौजे टाकळी येथे अनेक पिढ्यापासुन नागपंचमी या सणाच्या अनुशंगाने गावामध्ये सणाच्या चार दिवसा अगोदर पासुन जुगार नावाचा खेळ गावातील तसेच इतरचे पुरुष मंडळी खेळत असतात त्याच परंपरे नुसार या वर्षीही नागपंचमी सणाच्या पहिल्याच दिवशी गावात सुरु असलेल्या जुगारावर केज पोलीसांनी दबंग कारवाई करत जुगार खेळणार्याना ताब्यात घेत मोठा ऐवज जप्त केला असल्याची माहिती समोर येत असुन या कारवाईमुळे केज तालुक्यात मोठी खळबळ उडाली असुन जुगार्यांचे मात्र धाबे दनाणले आहेत. यामध्ये अनेक धनदांडगे जुगार खेळाडू त्यांच्या आठरा दुचाकी सह ताब्यात घेत केज पोलीस स्टेशन या ठिकाणी आणुन त्यांच्याकडील जप्त केलेली रक्कम ताब्यात घेतली असुन पुढील कारवाई सुरु आहे .आजच्या टाकळी येथे टाकलेल्या छाप्यामध्ये केजचे सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे , पोलिस उपनिरीक्षक पाटील,हे.कॉ.थोरात , हे.कॉ.जोगदंड ,पो.कॉ. सोनवणे ,पोकॉ.आवेज , पोकॉ.बहीरवाळ ,पोना. सोपने ,पोना.निरडे,पोह. सय्यद,पोह.सानप , पोना.नामदास आणी पोकॉ.इनकर यांच्या टिमने हि कारवाई केली असुन रात्री उशीरापर्यंत पुढील कारवाई केज पोलीस स्टेशन येथे सुरु होती. केज पोलीसांचे कौतुक पहाण्यासाठी पोलीस स्टेशन समोर लोकांची तोबा गर्दी होती .
