HomeUncategorizedमोटारसायकलला अज्ञात वाहनाची धडक ; एकाचा मृत्यू तर दोनजणांची प्रकृती गंभीर

मोटारसायकलला अज्ञात वाहनाची धडक ; एकाचा मृत्यू तर दोनजणांची प्रकृती गंभीर

बीड – औरंगाबाद – सोलापूर रोडवर पालीजवळ अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटर सायकल वरील नंदकुमार जयराम पवार वय आठ वर्ष या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली.असता त्यामध्ये नंदकुमार जयराम पवार हा जागीच मृत्यू पावला तर त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले. त्यांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले होते. परंतु त्या दोन्हीही जखमीची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचाराकरिता अर्चना जयराम पवार यांना घाटी रुग्णालय औरंगाबाद येथे हलवण्यात आले. तर जयराम भागवत पवार यांना आंबेजोगाई येथील रुग्णालयात हलवण्यात आले. दोन्हीही जखमीची परिस्थिती चिंताजनक असल्याचे माहिती मिळाली आहे.सदरील घटना कशी व कोणत्या कारणाने झाली. याची माहिती अद्यापही कळाली नाही. नंदकुमार पवार यांच्या मृत्यूची माहिती कळताच परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments