केज : तालुक्यातील आनंदगावसारणी शिवारातील येडेश्वरी ॲग्रो प्रोडक्ट लि.आनंदगाव साखर कारखान्याचे दूषित पाणी नदीच्या पाञात सोडलेले आहे.दूषित पाण्यामुळे जनावरांचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.दुषित पाण्याचा तात्काळ बंदोबस्त करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांमधून होत आहे. पावसाळा सुरू झाला ही संधी पाहून कारखान्याचे दूषित पाणी नाल्यात सोडून देण्यात आले आहे त्या दूषित पाण्याचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होत आहे. दूषित पाण्यामुळे पाळीव जनावरांचे मृत्यू झाले असल्याचे प्रकार यापूर्वी उघड झाले आहेत. शिवारातील विविध नाल्यांमध्ये पाणी जनावरांना पिण्यासारखे राहिलेले नाही दूषित पाणी पिल्याने पक्ष्यांचा वन्यप्राण्यांचा मृत्यू होऊ लागला आहे.नदीत,ओढा नाल्यात पाणी आल्याने ते पाणी जमिनीत मुरल्याने बोअर विहरीचे पाणी अशुद्ध होत आहे.अनेक नागरिक साथीच्या रोगाला बळी पडत आहेत.लहान मुले जेष्ठ नागरिक,गरोदर महिला यांच्या आरोग्यावर अधिक परिणाम होत आहे.कारखान्यांना दूषित पाण्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक असल्याचे नियम अटी झुगारून पाणी मोकाट सोडून दिले जात आहे प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे.
येडेश्वरी साखर कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे ; परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
RELATED ARTICLES