बीड : शिवसेनेच्या शिंदे गटाचे शिलेदार तथा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा भाजपच्या वतीने सलीम जहाँगीर यांनी सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे नाते नव्या परिवर्तनाची नांदी ठरेल अशा भावना यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी व्यक्त केल्या.बीड जिल्ह्यातील युवा नेतृत्व शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल भाजपच्या वतीने सलीम जहाँगीर यांनी त्यांचा हृदय सत्कार केला. खांडे यांच्या नियुक्तीनंतर बीड शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी बॅनर लागले आहेत. प्रत्येक बॅनरवर दिवंगत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यासह भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे , जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या फोटोंना स्थान दिले आहे. खांडे यांचे मुंडे कुटुंबीय आणि भाजपशी जवळचे संबंध आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गट हा आगामी काळात जिल्ह्यात परिवर्तनाची नांदी ठरेल असा विश्वास जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी व्यक्त केला. यावेळी नूरलाला , मुसाखान पठाण आदी उपस्थित होते.
शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे यांचा सलीम जहाँगीर यांच्याकडून सत्कार
RELATED ARTICLES