केज : घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी केज येथे एका माजी सैनिकाचे घर फोडून नगदी १८ हजार रुपये,एलईडी,भांडे, कारची चावी असा ३४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शहरातील कळंब रस्त्या लगत घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील माजी सैनिक दिनेश संपत्ती घोडके यांचे कुटुंब केज शहरात कळंब रस्त्या लगतच्या डीएड कॉलेजच्या समोरील भागात वास्तव्यास आहे. तर त्यांच्या पत्नी कुसुम घोडके या बनसारोळा येथे आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.दिनांक २४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता दिनेश घोडके हे त्यांचे जावई आजारी असल्याने कोल्हापूरला मुलीकडे गेले होते. तर त्यांची पत्नी कुसुम घोडके या लातूरला शिकत असलेल्या मुलीकडे गेल्या होत्या. त्यांच्या घराला कुलूप पाहून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घराच्या पाठी मागील भिंतीवरून आत येत चॅनल गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.घराची झडती घेऊन पर्समध्ये ठेवलेले नगदी १८ हजार रुपये, १५ हजार रुपये किंमतीचा एलईडी टी.व्ही,पितळी भांडे आणी कारची चावी असा ३४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. कुसुम घोडके यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यां विरुद्ध केज पोलिसात गु. र. नं. ३२३/२०२२ भा.दं. वि. ४५७, ३८०, ४५४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे हे करत आहेत.
चोरट्यानी माजी सैनिकाचे घर फोडले ; ३४ हजाराचा ऐवज लंपास
RELATED ARTICLES