केज : शहरात मध्यवर्ती भागात असलेले लघु पाटबंधारे कार्यालय सुमारे पाच-सहा एकर मध्ये स्थीत असुन सध्या अंधारात आहे.या कार्यालयाला लागूनच चारी बाजूने मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. लघु पाटबंधारे कार्यालयाला चांगले कुंपन होते. मात्र कालांतरांचे ते पडले असून ते बांधण्याचे कोणताही अधिकारी मनावर घेत नसल्याचे दिसते. सध्या येथे मुख्य कार्यालयात भोवती अंधार असतो.याचाच फायदा घेऊन येथे नको ते उद्योग चालतात.तरुण वर्ग गटागटाने बसून मोठ्या आवाजात मोबाईल लावणे, मोबाईलवर खेळ लावणे,सिगारेट पिणे, दारू पीणे त्यात काही आंबटशौकीनही आहे. तसेच या ठिकाणी वराहाचाही मोठ्या प्रमाणात वावर असतो. पाऊस आल्यावर पत्र्याच्या शेडमध्ये सर्व व्यवस्थित कार्यक्रम चालू असतात.या ठिकाणी फक्त कार्यालया पासून सुमारे दोनशे फुटावर नगरपंचायतच्या खांबावर लाईट दिसून येतेया ठिकाणी आमचे प्रतिनिधी तीन-चार वेळेस जाऊन आले तरी तेथे सुरक्षा रक्षक आढळून आला नाही.तरी सदरील कार्यालयामध्ये तात्काळ सुरक्षा रक्षक नेमून सर्वत्र लाईटची व्यवस्था करावी जेणेकरून हे सर्व थांबेल अशी मागणी जनतेतून होत आहे.
लघु पाटबंधारे कार्यालय बनले आंबट शौकीनाचे माहेर घर
RELATED ARTICLES