बीड : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा तिच्या नवऱ्याने दारुच्या नशेत शारीरिक व मानसिक छळ करुन दोन लाख रुपये माहेरहून घेऊन येण्याची मागणी केली.अशा तक्रारी वरून नवऱ्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, केज तालुक्यातील गप्पेवाडी येथील मंदाकिनी हिचा विवाह तीन वर्षापूर्वी परभणी जिल्ह्यातील वरखेड ता.पाथरी येथील अशोक चौरे यांच्या सोबत झाला. त्यानंतर एक वर्षा नंतर अशोक चौरे याने पत्नी मंदाकिनीला तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला दारू पिऊन बेदम मारहाण करीत असे. उपाशीपोटी ठेवून तिच्याकडून काम करून तिचा शारीरिक आणी मानसिक छळ करीत असे. दरम्यान दोन महिन्यापूर्वी देखील त्याने दारू पिऊन सहा महिन्यांची गरोदर असलेल्या मंदाकिनी हिला पायावर आणी पाठीवर वेळूच्या काठीने बेदम मारहाण केली. तसेच माहेरहून दोन लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. तिने ही माहिती माहेरी दिल्यानंतर तिचे वडील व चुलते यांनी वरखेड ता.पाथरी येथे जाऊन मंदाकिनी तिचा एक वर्ष वयाचा लहान मुलगा,तिच्या सासू-सासऱ्यांना गप्पेवाडी येथे घेऊन आले. मंदाकिनी हिला अशोक चौरे याच्यापासून एक वर्ष वयाचा आर्यन हा मुलगा असून ती दुसऱ्यांदा सहा महिन्यांची गरोदर आहे.मंदाकिनी अशोक चौरे हिने दिनांक २७ जुलै रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून तिचा पती अशोक चौरे रा.वरखेड ता.पाथरी जि.परभणी याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र.नं. ४१७/२०२२ भा.दं. वि. ४९८(अ), ३२३, ३२४, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक सिमा निरडे या पुढील तपास करीत आहेत.
चारिञ्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक ञास ; महीलेची पोलीसात तक्रार
RELATED ARTICLES